IMPIMP

Pune Crime | चोरीचे वीज कनेक्शन तोडण्यास गेलेल्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की, दिली जीवे मारण्याची धमकी; केसनंदमधील घटना

by bali123
Pune Crime | Raj Ravindra Pawar, a notorious criminal from Loni Kalbhor area of Pune, was deported for two years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बेकायदेशीरपणे चोरीचे घेतलेले वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार केसनंद मधील जोगेश्वरी सनसिटीमध्ये घडला. याप्रकरणी गणेश अप्पाराव श्रीखंडे (वय ३३, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पिंटु ऊर्फ जयंत सरडे (रा. कोरेगाव भिमा, ता. शिरुर) याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

गणेश श्रीखंडे आणि त्यांचे सहकारी अंजन शिंगणे हे केसनंदमधील मंगलमूर्ती वास्तू प्रा. लि. निर्मित जोगेश्वरी सनसिटीमध्ये शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता गेले होते. तेथे बेकायदेशीर चोरीने घेतलेले वीज कनेक्शनवर कारवाई करत होते. त्यावेळी सरडे हा त्यांच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करुन दमदाटी व धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देऊन ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांचे सहकारी अंजन शिंगणे याच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Tital : Pune Crime | people beat mseb wireman in kesnand area

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! लवकरच खात्यात येणार मोठी रक्कम, जाणून घ्या डिटेल

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्लांविरोधात सरकारकडे कोणताही पुरावा नाही; वकिलाचा उच्च न्यायालयात युक्तिवाद

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीत जबरदस्त घसरणीने ग्राहक खुश, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन भाव 

Related Posts