IMPIMP

Pune Crime | घरात गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घरात पोत्यात गांजा (cannabis) साठवून त्याच्या छोट्या छोट्या पुड्या करुन विक्री करत असल्याचे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotic Cell Pune) टाकलेल्या छाप्यात आढळून आले. आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथील एका फ्लॅटमधून पोलिसांनी (Pune Police) दोन पोत्यात ठेवलेला 20 किलो 940 ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक काटा, गांजा पिण्याचे पेपर रोल बॉक्स असा 4 लाख 23 हजार 400 रुपयांचा माल जप्त (Pune Crime) केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अमित ऊर्फ बॉब प्रभाकर कुमावत Amit alias Bob Prabhakar Kumawat (वय 32, रा. समर्थनगर, हिंगणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे हवालदार मारुती नामदेव पारधी Constable Maruti Namdev Pardhi (वय 46) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलीस नाईक विशाल शिंदे यांना अमित कुमावत हा घरात गांजा ठेवून त्याची विक्री करीत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad), हवालदार मनोज साळुंके, विशाल दळवी, विशाल शिंदे , रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते या पथकाने आंबेगाव बुद्रुक येथील दांगटनगरमधील (Dangtnagar) घरावर छापा घातला. तेथे बेडरुममध्ये दोन पोत्यांमध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी 4 लाख 18 हजार रुपयांचा 20 किलो 940 ग्रॅम गांजा, गांजा पिण्याचे पेपर रोल, वजन काटा असा 4 लाख 23 हजार 400 रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या (Bharati Vidyapeeth Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune police Crime Branch Anti Narcotic Cell arrests youth for selling cannabis at home

 

हे देखील वाचा :

PAN-Aadhaar Linking | 1 जुलैनंतर पॅन-आधार लिंक करणे पडणार महागात, आत्ताच करा लिंक; जाणून घ्या सोपी पद्धत

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ! CBI ने दाखल केले आरोपपत्र

Sarkari Pension Scheme | एकदाच जमा करा पैसे, 60 व्या वयानंतर दरमहिना पेन्शनची गॅरंटी; जाणून घ्या

 

Related Posts