IMPIMP

Pune Crime | हॉटेलच्या व्यवसायातून 55 लाखाची फसवणूक, पुण्यात रवीअण्णा दांडेली आणि रमेश भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | FIR against husband and daughter's father in child marriage case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनभागीदारीमध्ये (Partnership) सुरु करण्यात आलेल्या हॉटेल व्यवसायातून (Hotel Business) एकाची 55 लाखाची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत वानवडी गाव (Pune Crime) येथे घडला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रवी अण्णा हनुमंत दांडेली Ravi Anna Hanumant Dandeli (रा. बी.टी. कवडे रोड, दळवीनगर, पुणे), रमेश शंकरलाल भंडारी Ramesh
Shankarlal Bhandari (रा. जगताप चौक, वानवडी, पुणे) यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृष्णा नारायण
मणिकल Krishna Narayan Manikal (वय-42 रा. ओम सोसायटी, बी.टी. कवडे रोड, दळवीनगर, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा मणिकल आणि रवी दांडेल यांनी भागीदारीत हॉटेल शिपयार्ड (Hotel Shipyard) हे हॉटेल सुरु केले होते. यासाठी रमेश भंडारी यांची जागा भाडेतत्वावर घेतली होती. फिर्यादी यांनी हॉटेल सुरु करताना रमेश भंडारी याला आरटीजीएस (RTGS) आणि रोख स्वरुपात 55 लाख रुपये देऊन व्यवसायात गुंतवणूक केली होती. 2018 मध्ये फिर्यादी हे भागीदारीतून बाहेर पडले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यानंतर रवि दांडेल याने फिर्यादी हे भागीदार असल्याचे माहित असून देखील त्यांच्या परस्पर रमेश भंडारी याला हॉटेल विकले. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांनी गुंतवलेले (Investment) पैसे मागितले. त्यावेळी दांडेल याने पैसे देण्यास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कृष्णा मणिकल यांनी तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्जाची तपासणी करुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Ravi Anna Dandeli and Ramesh Bhandari charged in Pune with Rs 55 lakh fraud from hotel business

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे पोलिसांकडून ‘कालीचरण महाराज’ला अटक, पथक रायपूरहून पुण्याकडे रवाना

Restrictions in Maharashtra | आज रात्रीपासून महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार? सरकारची टास्क फोर्सबरोबर बैठक संपली

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट दर

 

Related Posts