IMPIMP

Restrictions in Maharashtra | आज रात्रीपासून महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार? सरकारची टास्क फोर्सबरोबर बैठक संपली

by nagesh
Restrictions in Maharashtra | maharashtra deputy chief minister ajit pawar holds meeting with task force on maharashtra Restrictions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Restrictions in Maharashtra | कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन व्हेरिएंट विषाणूने (Omicron Corona Variant) राज्याची चिंता वाढवली आहे. राज्यात दैनंदिन कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगोदरच राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यात काही निर्बंध लागू केलेत. दरम्यान दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध (Restrictions in Maharashtra) लागण्याची तयारी सुरू आहे. याबाबत नुकतंच आज सकाळी राज्य सरकारची टास्क फोर्स (Task Force) बरोबर बैठक संपली आहे. आज रात्रीपासून राज्यात नवी नियमावली जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज (बुधवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे हे घेतलेले निर्णय रात्री जाहीर होण्याची शक्यता आहे. तुर्तास राज्यात लाॅकडाऊन (Lockdown) नाही मात्र कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर, राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थिती 50 ते 75 टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता आहे. शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम (Work From Home) लागू करण्याची शक्यता आहे. दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या होणार असल्याची चर्चा आहे. अशा आदी गोष्टीवर विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (Restrictions in Maharashtra)

दरम्यान, सध्या राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. परंतु सध्या राज्यात वाढणा-या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (Maharashtra Government) मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता राज्यात रात्रीपासून कशा पद्धतीचे नियम लागू होणार? याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Restrictions in Maharashtra | maharashtra deputy chief minister ajit pawar holds meeting with task force on maharashtra Restrictions

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट दर

Sindhutai Sapkaal Passed Away | अनाथांची माय जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे 73 व्या वर्षी पुण्यात निधन

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात 18,466 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts