IMPIMP

Pune Vishrantwadi Crime | पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

by sachinsitapure

पुणे :  Pune Vishrantwadi Crime | अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) अटक केली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत पीडित मुलगी राहत असलेल्या धानोरी (Dhanori) येथील घरात घडली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीच्या आईने बुधवारी (दि.20) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनिकेत बालाजी कांबळे Aniket Balaji Kamble (वय-23 रा. परांडेनगर, धानोरी) याच्यावर आयपीसी 376. 376/2/एन, पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Vishrantwadi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात.
आरोपीने मुलगी घरात एकटी असताना तिच्या घरी गेला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे आमिष दाखवले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गरोदर राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उजेडात आले. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

तरुणीच्या घरात घुसून विनयभंग

पाषाण (Pashan) : तरुणीच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन
विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना पाषाण येथील सुतारवाडी रोडवर घडली आहे.
याप्रकरणी 19 वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्य़ाद दिली आहे.
यावरुन ऋतिक आरटु काळे Hrithik Artu Kale (रा. विठ्ठलनगर, पाषाण) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी 17 मार्च रोज दुपारी दोनच्या सुमारास घरात झोपली होती. त्यावेळी आरोपी घरी आला.
त्याने झोपेत असलेल्या तरुणीसोबत अश्लील वर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Loni Kalbhor Crime | दुकानातील कामगाराने केला सव्वा कोटींचा अपहार, कुंजीरवाडी परिसरातील घटना

Related Posts