IMPIMP

Sangli Crime | सांगलीत युवकाचा निर्घृण खून; शहरात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | a woman was killed and stoned in the head in chakan mhalunde pune district

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Sangli Crime | रस्त्यावर अंडा भुर्जीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून हत्या (Murder In Sangli) करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत (Sangli Crime) घडली आहे. 3 अज्ञात हल्लेखोरांनी युवकाची हत्या करुन चालवत असलेल्या गाड्याचीही तोडफोड केली आहे. ही घटना सांगलीतील शंभर फुटी रोडवर घडली. संतोष पवार (Santosh Pawar) असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, सांगलीतील विश्रामबाग शंभर फुटी रोड वर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाजवळ संतोष पवार हा अंडा भुर्जीचा व्यवसाय करत होता. छोट्या चारचाकी गाडीमधून त्याचा हा व्यवसाय सुरू होता. रविवारी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास आलेल्या 3 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी संतोष पवार याच्यावर हल्ला (Attack) केला. या हल्ल्यामध्ये संतोषचा जागीच मृत्यू (Died) झाला. (Sangli Crime)

 

या घटनेनंतर हल्लेखोरांनी संतोषच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करत साहित्य रस्त्यावर फेकून दिले आहे.
तसेच हल्लेखोर पसार झाले. या घटनेबाबत माहिती समजताच विश्रामबाग पोलिस (Vishrambaug Police, Sangli) घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर पंचनामा करण्यात आला. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याची माहिती अजून समोर आली नसून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Sangli Crime | Santosh Pawar Murder Case Vishrambaug Police

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Maharashtra Monsoon Update | केरळात पोहोचला मान्सून ! महाराष्ट्रातही लवकरच बरसणार पावसाच्या सरी – IMD

Amul Organic Wheat Flour | किराणा बाजारात Amul ची एंट्री, सादर केले ऑर्गेनिक गव्हाचे पीठ

 

Related Posts