IMPIMP

Maharashtra Monsoon Update | केरळात पोहोचला मान्सून ! महाराष्ट्रातही लवकरच बरसणार पावसाच्या सरी – IMD

by nagesh
Maharashtra Rain | mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | मागील काही दिवसापुर्वी मान्सूनचं अरबी समुद्रात (Arabian Sea) आगमन
झालं होतं. काही कालावधीत मान्सूनने पुन्हा विश्रांती घेतली. देशातील केरळ (Kerala) भागात प्रथम मान्सूनचं आगमन होतं. मात्र हवामानाच्या
अंदाजानुसार Indian Meteorological Department (IMD) मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा वेळेआधीच मान्सून केरळात दाखल
झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर मान्सूनचा आगामी प्रवासही वेळेत होणार असून आता महाराष्ट्रातही पावसाच्या सरी (Maharashtra
Monsoon Update) बरसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून 6 जून ते 10 जून या काळात महाराष्ट्रात धडकणार आहे. मान्सूनच्या (Monsoon) प्रवासाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यात काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारपासून सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवला जात आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

दरम्यान, कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाड्याच्या (Marathwada) प्रामुख्याने दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देखील दिला आहे. तसेच, पश्चिम विदर्भ, महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | weather report monsoon arrives in kerala konkan vidarbha in maharashtra rains arrive in western maharashtra

 

हे देखील वाचा :

Amul Organic Wheat Flour | किराणा बाजारात Amul ची एंट्री, सादर केले ऑर्गेनिक गव्हाचे पीठ

Aadhaar Card | आधार कार्डबाबत केंद्राची नवीन अ‍ॅडव्हायजरी, फोटोकॉपी शेअर करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…

Chandrakant Patil | अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले….

 

Related Posts