IMPIMP

Wardha Car Accident | नदीत कार कोसळून वर्ध्यात भीषण अपघात; भाजप आमदाराच्या मुलासह मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यु

by nagesh
Wardha Car Accident | wardha car accident bjp mla vijay rahangdales son avishkar rahangdale and others 7 MBBS students of datta meghe medical college killed in crash

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाइन Wardha Car Accident | भरधाव जात असताना एसयुव्ही (SUV) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील
नदीच्या पुलावरुन गाडी ४० फुट खोल नदीत कोसळून त्यात ७ मेडिकलच्या (7 Medical Students Died) विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. हे सर्व विद्यार्थी दत्ता
मेघे मेडिकल कॉलेजचे (Datta Meghe Medical College) विद्यार्थी असून ते वसतीगृहात रहात होते. त्यात तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले
(MLA Vijay Rahangdale) यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले (Avishkar Vijay Rahangdale) याचा समावेश आहे. (Wardha Car Accident)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नितेशसिंग, विवेक नंदन, प्रत्युशसिंग, शुभम जयस्वाल, पवन शक्ती, नीरज चौहान अशी या इतर विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील ३ विद्यार्थी उत्तर प्रदेशचे
तर २ बिहार आणि एक ओडिशा येथील राहणारे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, हे सर्व विद्यार्थी MBBS चे दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये
शिकत होते. कॉलेजच्या वसतीगृहात रहात होते. दररोज रात्री १० वाजता हॉस्टेलमध्ये हजेरी घेतली जाते. तेव्हा हे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसल्याचे लक्षात
आल्यावर विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना त्याची कल्पना देण्यात आले. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर आलो असल्याचे आपल्या
पालकांना कळविले होते. रात्री उशिरापर्यंत हे विद्यार्थी हॉस्टेलवर परत न आल्याने हॉस्टेलमधील वरिष्ठांना त्यांची चिंता लागून राहिली होती.

 

 

पहाटेच्या सुमारास या अपघाताची माहिती समोर आली. हे विद्यार्थी वाढदिवस साजरा करुन देवळी येथून वर्धा येथे येत असताना सेलसुराजवळ नदीच्या
पुलावरुन त्यांची कार पाण्यात कोसळली (Wardha Car Accident). या घटनेची माहिती समजताच वर्धाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष
जगताप (SDPO Piyush Jagtap) व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे चार वाजेपर्यंत सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
सर्वांचे मृतदेह वर्धा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Wardha Car Accident | wardha car accident bjp mla vijay rahangdales son avishkar rahangdale and others 7 MBBS students of datta meghe medical college killed in crash

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीनेच बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा आवळला गळा

Pune Corporation | समाविष्ठ गावातील कामाच्या श्रेयासाठी भाजप – राष्ट्रवादीचे नगरसेवक सरसावले

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा प्रीमियम देऊन दरमहिना मिळवू शकता 12,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

Related Posts