IMPIMP

Grammy 2023 | रिकी केज यांनी रचला इतिहास; 3 वेळा जिंकला ग्रॅमी पुरस्कार

by nagesh
Grammy 2023 | ricky kej won third grammy award for divine tides

सरकारसत्ता ऑनलाईन –  Grammy 2023 | बेंगळुरूच्या रिकी केजने (Ricky Kej) रविवारी तिसरा ग्रॅमी पुरस्कार ‘ डिव्हाईन टाइड्स ‘ या अल्बमसाठी जिंकला. हा अल्बम त्यांनी स्टीवर्ट कोपलँड, द पोलीस आयकॉनिक रॉक बँड आणि ड्रमर यांच्या सहयोगाने केला होता.संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कारांपैकी मानला जाणारा ग्रॅमी पुरस्कार हा एक आहे. यंदाचा 65 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा अमेरिकेमधील लॉस एंजेलिस शहरामध्ये पार पडला. संगीत विश्वामधील अनेक मान्यवरांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. (Grammy 2023)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रिकी केज यांनी यापूर्वी 2015 मध्येही ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. ‘विंड्स ऑफ संसार’ या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर गेल्या वर्षी 2022 मध्ये त्यांनी दुसऱ्या ग्रॅमी पुरस्काराची कमाई केली होती. नुकतेच रिकी केज यांनी या सोहळ्यामधील काही फोटो त्यांच्या सोशल अकाऊंटवरून शेअर केले. त्यांनी या फोटोंना ”मला नुकताच तिसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. माझ्या भावना सध्या मला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीयेत. मी सर्वांचा ऋणी आहे. हा पुरस्कार मी माझ्या भारत देशाला समर्पित करत आहे” असे कॅप्शन दिले आहे. त्यांनी शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Grammy 2023)

 

 

तिसऱ्यांदा रिकी केज यांना त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमला ‘बेस्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम’ या विभागामध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
रिकी यांनी जगभरातील 20 पेक्षा जास्त देशांमधील 100 पुरस्कांरांपेक्षा अधिक पुरस्कार जिंकले आहेत.
भारताचा युवा आयकॉन म्हणूनदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
रिकी यांनी आता ग्रॅमी पुरस्काराच्या माध्यमातून देशाचे नाव जगात रोशन केले आहे.
तिसऱ्यांदा ग्रॅमी जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बममध्ये एकूण नऊ गाणी
आणि आठ म्युझिक व्हिडीओंचा समावेश आहे.
या म्युझिक व्हिडीओंमध्ये हिमालयाच्या अत्युत्तम सौंदर्यापासून ते स्पेनच्या बर्फाळ जंगलांपर्यंत अनेक नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गाण्यांची प्रेरणा पर्यावरणाकडून येत असल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे.
रिकी यांच्यासह याआधी 3 भारतीय संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.
त्यात प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एआर रहमान, रविशंकर, झाकीर हुसेन या मोठ्या नावांचा समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Grammy 2023 | ricky kej won third grammy award for divine tides

 

हे देखील वाचा :

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळपास ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर टीका; म्हणाले…

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस भाजपबरोबरच हिंदू महासंघाचा ‘हा’ उमेदवार लढणार निवडणुक

 

Related Posts