IMPIMP

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर टीका; म्हणाले…

by nagesh
Gopichand Padalkar | maybe sharad pawar is saying all this through the mouth of jitendra awhad gopichand padalkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज
(Chhatrapati Shivaji Maharaj) आणि औरंगजेबाबाबत (Aurangzeb) केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यावरून
राज्याच्या राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आमदार जितेंद्र आव्हाड
यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी (Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad
Pawar) यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि हिंदू देव, देवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील. असं मला वाटतं आहे.’ असं म्हणतं अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

तर यावर पुढे बोलताना ते (Gopichand Padalkar) म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही, की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा (Ajit Pawar) अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा (Rohit Pawar) रज्जाक झाला असता. परंतु मतांच्या राजकारणासाठी घाणेरडं विधान करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची मागील ५० वर्षांतील कूट नीती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजेत. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावं, हे पवारांकडून कशापद्धतीने मतासाठी राजकारण केलं जातयं हे महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेलं आहे आणि आजही बघत आहेत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील.’ अशी टीका यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबियांवर केली.

 

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे.
त्यात त्यांनी प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाही, मुघल अशा सर्वांचा उल्लेख केला आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा.
आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा.’
असा मजकूर त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिला आहे. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

Web Title :-  Gopichand Padalkar | maybe sharad pawar is saying all this through the mouth of jitendra awhad gopichand padalkar

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस भाजपबरोबरच हिंदू महासंघाचा ‘हा’ उमेदवार लढणार निवडणुक

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी

Pune Crime News | बंद पडलेला व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे घेऊन एक कोटीची फसवणूक; राम निरंजन डागा, संदीप डागासह महिलेविरूध्द गुन्हा दाखल

 

Related Posts