IMPIMP

Jhund Movie Fame Babu | झुंड सिनेमातील ‘बाबू’ची भूमिका गाजवलेल्या अभिनेत्याला पोलिसांकडून अटक

by nagesh
Jhund Movie Fame Babu | nagraj manjule jhund movie fame babu actor priyanshu kshatriya arrested in theft case nagur

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Jhund Movie Fame Babu | नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमातील कलाकार आजही सर्वांना आठवतात. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या मुलांनी थेट अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केल्याने प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले होते. या सिनेमात प्रियांशु रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे. झुंड सिनेमात प्रियांशूने बाबू ही भूमिका साकारली होती आणि ती चांगलीच गाजली होती. बाबू ने प्रेक्षकांच्या मनावर त्याची छाप देखील पाडली होती. (Jhund Movie Fame Babu)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

झुंड हा चित्रपट नागपूरचे क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम देखील दिले होते. नागराज मंजुळे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. त्यामध्ये अनेक कलाकारांनी अभिनयाची पार्श्वभूमी नसताना देखील उत्तम अभिनय सादर केला होता. याच कलाकारांपैकी एक असलेल्या अठरा वर्षाच्या प्रियांशुला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. (Jhund Movie Fame Babu)

काही दिवसांपूर्वीच नागपूर येथील घरफोडीची घटना उघडकीस आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीतील प्रदीप हरबाजी मोडावे यांच्या घरी ही चोरी झाली होती. या चोरीमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 75000 चे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी दोन अल्पवयींना ताब्यात घेतलं होते. तर चौकशी दरम्यान या घरफोडीत प्रियांशू ही सहभागी असल्याचे समोर आले. काही काळ प्रियांशु हा फरार होता मात्र दरम्यान बाबू गड्डी गोदाम परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याला 25 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गड्डी गोदाम मधील कबुतरांच्या पेटीत लपवलेले दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांनी खाकी वर्दी दाखवल्यावर आरोपींनी आणखीन काही घरफोड्याच्या घटना कबूल केल्या आहे.
एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी प्रियांशु गांजा पिताना आढळला असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई देखील केली होती.
प्रियांशुने झुंड सिनेमात त्याच्या बोली भाषेने अमिताभसह सर्वांनाच प्रभावित केले होते.
एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रमोशनवेळी देखील त्यांनी कार्यक्रमातून खऱ्या आयुष्यातील काही किस्से लोकांसमोर व्यक्त केले होते.
यावेळी प्रेक्षका नागराजने हिरा शोधला अशीच भावना व्यक्त करत होते.
मात्र आता नागराजचा हाच हिरा काळवंडला अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jhund Movie Fame Babu | nagraj manjule jhund movie fame babu actor priyanshu kshatriya arrested in theft case nagur

हे देखील वाचा :

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने बोम्मई यांना पुढे करुन सीमावादाचा प्रश्न काढला’

Related Posts