IMPIMP

कंगनाने घेतली मंत्री प्रकाश जावडेकरांची भेट, ‘या’ विषयावर केली चर्चा

by bali123
kangana ranaut meets information and broadcast minister prakash javdekar in delhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अभिनेत्री कंगना रणौत kangana ranaut ही नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून विविध विषयांवर नेहमी वक्तव्य करत असते. अनेकवेळा तिचे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. यापूर्वी कंगनाने घराणेशाही, बॉलिवूडमध्ये येण्यासाठी नव्या आणि बाहेरच्या व्यक्तीला करावा लागणारा स्ट्रगल यावर ती सतत वक्तव्य करत असते. यासंदर्भात तिने नुकतीच केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या भेटीची माहिती तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली.

कंगनाने प्रकाश जावडेकर यांच्या सोबतचा फोटो कॅप्शनसह शेअर केला आहे. कंगना kangana ranaut म्हणते आज शूटिंगनंतर आदरणीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. खासकरून महिलांना आणि बॉलिवूडमध्ये पूर्णत: नवीन लोकांना सहन करावा लागणारा भेदभाव यासंदर्भात बोलणं झाल्याचे तिने सांगितले. तसेच तुमच्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद, असे कंगनाने म्हटले आहे.

कंगना सध्या दिल्लीमध्ये तिच्या ‘तेजस’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. चित्रीकरणानंतर तिने जावडेकर यांची भेट घेतली. तेजस या चित्रपटात कंगना हवाई दलाच्या पायलटची भूमिका साकारत आहे. तेजस हा चित्रपट भारताच्या सैन्य दलाला दिलेली मानवंदना असणार असल्याचे कंगनाचे म्हणणे आहे.

याशिवाय कंगनाचे आणखी दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘थलायवी’ या चित्रपटात कंगना दिवंगत नेत्या जयललिता यांच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत प्रकाश राज, अरविंद स्वामी, जिशू सेनगुप्ता, मधू हे कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे, तर अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्यासोबतचा ‘धडक’ हा चित्रपट 1 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मनसेचा सवाल, म्हणाले – ‘आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मध्यरात्रीनंतर ‘दिशा’च्या चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी कशी?

Photos : सोनाक्षी सिन्हाच्या दबंग अवाताराचा सोशलवर ‘बोलबाला’ !

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपा’च्या ग्लॅमरस लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

तब्बल 20 वर्षांनंतर येणार RHTDM चा सीक्वल ! क्रिती सेननचं नाव फायनल

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

Related Posts