IMPIMP

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर

by nagesh
Kili Paul | kili paul dance on riteish deshmukh ved lavlay song watch video

सरकारसत्ता ऑनलाईन  – Kili Paul | सध्या अभिनेता रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. आता या चित्रपटाने भारतातच नाही तर भारताबाहेर देखील लोकांना वेड लावले आहे. आता परदेशातील लोकही ‘वेड लागलंय” या गाण्यावर रिल करताना दिसत आहेत. प्रसिद्ध रील स्टार किली पॉललाही सध्या ‘वेड’च्या ‘वेड लावलंय’ या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावरील त्याच्या डान्सचा रील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Kili Paul)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

किली पॉल हा दक्षिण आफ्रिकेच्या तंजानियामधील एक प्रसिद्ध रील स्टार आहे. तो भारतातील गाण्यांवर रील बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध मानला जातो. इंस्टाग्रामवर त्याचे चार मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. आता किलिला सुद्धा रितेश देशमुखच्या वेड लावलंय या गाण्याची भुरळ पडल्याचे दिसत आहे. वेड लावलंय या गाण्यावर धमाल डान्स करत किलीने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये म्हटले की, “हे मराठी गाणी म्हणजे आयुष्य… वेड लावले…. कुणी मराठी चाहते आहेत का इथे?” याचबरोबर किलीने या पोस्टमध्ये सलमान खान, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनाही टॅग केले आहे. (Kili Paul)

 

 

किलीचा आता हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला असून त्यावर स्वतः रितेश देशमुख ने देखील कमेंट करत
त्याचे कौतुक केले आहे. यावेळी रितेश देशमुखने कमेंट करत म्हटले की, “तुम्ही खरंच कमाल आहात खूप सारे प्रेम”.
किलीचे हे व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
तर वेड चित्रपटाच्या टिझर ट्रेलर सह सगळ्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली होती.
या चित्रपटाला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात रितेश जेनेलिया सोबतच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर या चित्रपटात सलमान खान हा पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत झळकला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kili Paul | kili paul dance on riteish deshmukh ved lavlay song watch video

 

हे देखील वाचा :

State Excise Department | अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुण्यात 25 जणांना न्यायालयाने केला 37 हजारांचा दंड

Sourav Ganguly Statement | सचिन-विराटच्या तुलनेवरील वादावर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Amit Deshmukh | अमित देशमुखांचा भाजप प्रवेश?; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

 

Related Posts