IMPIMP

Kranti Redkar | NCB च्या जळगाव, नांदेडमधील गांजा कारवाईनंतर क्रांती रेडकर यांचं ट्वीट; म्हणाल्या…

by nagesh
Kranti Redkar | sameer wankhede's wife and actress kranti redkar wankhede reaction after ncb seized ganja in jalgaon and nanded

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Kranti Redkar | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र, मलिकांचे आरोपाचे सत्र सुरूच आहे. तर, समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी नांदेड आणि जळगावमध्ये एनसीबीने केलेल्या कारवाईवरून सूचक ट्वीट केलं.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे मुंबई एनसीबीच्या (NCB) पथकाने 1500 किलो गांजा जप्त करत कारवाई केली.
तसेच, नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत 1100 किलो गांजा जप्त केला.
यात एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आलीय.
दोघा संशयित तस्करांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईबाबत माहिती समीर वानखेडे यांनीच दिली आहे.

 

 

या कारवाईनंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
‘ना रुकेंगे, ना थमेंगे…’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या मलिक यांना व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना हा टोला असल्याची चर्चा आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (Aryan Khan Drugs Case) हे खंडणीसाठी घडवून आणण्यात आलं होतं.
काही लोकांना अडकवण्यासाठी ठरवून क्रूझवर पार्टी ठेवण्यात आली होती.
यामागे वानखेडे हे होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
या प्रकरणातील काही पंच पुढं आल्यानंतर पैशांची देवाणघेवाण झाल्याचंही समोर आलं होतं.
केवळ क्रूझ प्रकरणच नव्हे तर एनसीबीनं (NCB) अशा 26 प्रकरणांत बोगस कारवाया केल्याचाही नवाब मलिक यांचा आरोप आहे.

 

Web Title : Kranti Redkar | sameer wankhede’s wife and actress kranti redkar wankhede reaction after ncb seized ganja in jalgaon and nanded

 

हे देखील वाचा :

IND vs NZ T20 Series | भारताविरुद्धच्या T – 20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; केन विलियम्सन नाही तर ‘हा’ खेळाडू असणार न्यूझीलंडचा कर्णधार

Kolhapur Crime | हनी ट्रॅपला कंटाळून 32 वर्षीय युवकाची आत्महत्या? सुसाईडपुर्वी चिठ्ठीत लिहिला मोबाईलचा Password

PM Kisan | पीएम किसान योजनेची रिफंड यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? चेक करा

 

Related Posts