IMPIMP

EPF दर महिन्याला पैसे जमा केल्यास देते 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त, केवळ करावे लागेल ‘असं’ प्लॅनिंग; जाणून घ्या

by nagesh
Employees' Provident Fund Organisation (EPFO Alert) | epfo alert salary limit under epf to increased to 21000 rs from 15000 rs know latest update

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– EPF | दर महिना पगारातून होणारे एक डिडक्शन निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला करोडपती बनवू शकते. ते डिडक्शन म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील (EPF) तुमचे मासिक योगदान आहे. याबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

किती मिळते EPF फंडवर व्याज-

तुमच्या ईपीएफ फंडवर मागील आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज मिळाले आहे. हे बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट आणि अनेक सरकारी बचत योजनांपेक्षा जास्त व्याज आहे.

 

 

कसे मिळतील 1.65 कोटी रुपये-

या व्याजदरासह 25,000 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या एका व्यक्तीकडे 35 वर्षात जवळपास 1.65 कोटी रुपये जमा होऊ शकतात. ईपीएफ वर मिळणारे व्याज टॅक्स फ्री असते. या निधीत एम्प्लॉयरकडून सुद्धा समान योगदान दिले जाते. आपल्या ईपीएफ इन्व्हेस्टमेंटमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा करण्यासाठी तुम्हाला हे ठरवावे लागेल की, तुम्ही निवृत्त होईपर्यंत ईपीएफ अकाऊंटमधून पैसे काढणार नाही. नोकरी सुरू करण्याच्या पाच वर्षाच्या आत ईपीएफ मधून रक्कम काढल्यास टॅक्स भरावा लागतो.

 

 

करावे लागेल हे प्लॅनिंग –

प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2 ते 3 वर्षात नोकरी बदलण्याचा ट्रेंड आहे. अशा स्थितीत लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा तुम्ही तुमची नोकरी बदलता तेव्हा PF अकाऊंटमधून पैसे काढण्याऐवजी ते नवीन खात्यात ट्रान्सफर करा.

 

 

याबाबत काय म्हणतात एक्सपर्ट-

Finology चे चीफ इन्व्हेस्टमेंट अधिकारी, प्रांजल कामरा यांच्यानुसार, देशात अ‍ॅव्हरेज इन्फ्लेशन
मोठ्या कालावधीत जवळपास 6 टक्के आणि ईपीएफ वर व्याज जवळपास 8.5 टक्के मानल्यास
निवृत्तीनंतर चांगला फंड मिळू शकतो. ईपीएफ पगारदार व्यक्तींसाठी मर्यादित गुंतवणुकीच्या
पद्धतींपैकी एक आहे, जी त्यांना निवृत्तीपर्यंत एक मोठा फंड बनवण्यात मदत करते.

 

Web Title : epfo get more than 1 crore rupees of pf account holders check all details here

 

हे देखील वाचा :

Murder in Chakan | हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या रागातून तरुणाचा खून, तर एकावर खुनी हल्ला

Bachchu Kadu | ‘राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’ – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

Pune News | 82.34 कोटीचे बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण ! निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

 

Related Posts