IMPIMP

Jan Dhan खातेधारकांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार लवकर करू शकते घोषणा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा?

by nagesh
JanDhan Account | jandhan account holders withdrawing 10000 rupees without minimum balance know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Jan Dhan | जनधन खातेधारकांना (PM Jan Dhan) सरकारकडून मोठी भेट मिळू शकते. मोदी सरकार लवकरच जनधन खातेधारकांसाठी नवीन सुविधा सुरू करणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या (PMJDY) सर्व खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात कव्हरचा लाभ मिळू शकतो. सरकार पंतप्रधान जीवन ज्योती विमा (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमाद्वारे विमा कव्हर देण्यावर विचार करत आहे.

अर्थ मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले आहे की, सरकार पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) च्या अंतर्गत PMJDY खातेधारकांचे कव्हरेज ठरवण्याची योजना बनवत आहे.

 

 काय म्हटले मंत्रालयाने?

अर्थ मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले की, सरकार पंतप्रधान जन-धन योजनेच्या 430 मिलियन खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात कव्हर प्रदान करण्यावर विचार करत आहे.

 

जाणून घ्या काय आहे योजना?

केंद्र सरकार द्वारे सामाजिक-सुरक्षा अभियानांतर्गत सरकार पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) सुरू करण्यात आल्या होत्या.

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत जीवन विमा दिला जातो. यासाठी वार्षिक प्रीमियम 330 रुपये द्यावा लागतो. याशिवाय, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत आकस्मिक मृत्यु आणि पूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत 2 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर दिले जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तुम्ही सुद्धा उघडू शकता जनधन खाते

प्रधानमंत्री जनधन योजनेत खाते पब्लिक सेक्टर बँकांमध्ये उघडले जाते. परंतु प्रायव्हेट बँकेत सुद्धा
आपले जनधन अकाऊंट उघडू शकता. जर तुमच्याकडे एखादे सेव्हिंग अकाऊंट असेल तर ते जनधन खात्यात बदलू शकता.

 

हे डॉक्युमेंट आवश्यक

– भारतात राहणारा कुणीही नागरिक, ज्याचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तो जनधन खाते उघडू शकतो.

– जनधन खाते उघडण्यासाठी केवायसी अंतर्गत डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन केले जाते. या डॉक्युमेंट्सचा वापर करून जनधन खाते उघडता येऊ शकते.

– आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड ही कागदपत्र आवश्यक आहे.

 

Web Title : jan dhan account holders to get insurance modi government will plan check details

 

हे देखील वाचा :

Pune News | महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठाण ट्रस्टकडून कात्रज परिसरात श्रावण सोमवारचे औचित्य साधून विविध कार्यक्रम

Miss Heritage India | मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’ किताब

Gold Price Today | किमतीमधील हालचालीने गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ ! आता ‘या’ कॅरेटचं सोनं 27635 रुपयात 10 ग्रॅम, जाणून घ्या

 

Related Posts