IMPIMP

प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे निधन; किडनी ट्रान्सप्लांटनंतर कोरोना

by sikandershaikh
Sardul sikander

नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर (Sardul sikander) यांचे आज निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. पंजाबच्या मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदूल सिकंदर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. किडनी ट्रान्सप्लांटनंतर त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सरदूल सिकंदर यांना किडनीच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. याचदरम्यान किडनी ट्रान्सप्लांटही करण्यात आले. त्यांच्यावरील ऑपरेशनही यशस्वी झाले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानुसार त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र, त्यातच त्यांचे निधन झाले.

दरम्यान, सरदूल सिंकदर यांच्या निधनाने पंजाब कला क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रुग्णालय आणि घराजवळ चाहत्यांनी गर्दी केली.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

सरदूल सिकंदर (Sardul sikander) यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दु:ख व्यक्त केले.
त्यांनी ट्विट करून सांगितले, की पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख झाले.
त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु होते.
त्यांच्या निधनाने पंजाबी कला गायन क्षेत्र पोरका झाला आहे. मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो.

विविध गाण्यांचे गायन

‘एक कुडी दिल उट्टे छा गयी’, ‘ठोकरण’, ‘एक चरखा गली दे विच’ यांसारख्या प्रसिद्ध गाण्याचे त्यांनी गायन केले होते.
त्यांची ही गाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती.

Related Posts