IMPIMP

Jalgaon Crime | जळगावमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार; प्रचंड खळबळ

by nagesh
jalgaon crime | attempt to firing on deputy mayor kulbhushan patil in jalgaon

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Jalgaon Crime । जळगाव जिल्ह्यातील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) उपमहापौरावर गोळीबार आल्याची धक्कादायक घटना (Crime) घडली आहे. रात्री 9 वाजेच्या सुमारास हल्ला झाला आहे. कुलभूषण पाटील (Deputy Mayor Kulbhushan Patil) असे उपमहापौराचे नाव असून त्यांच्या निवासस्थानी हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मात्र कुलभूषण पाटील हे या हल्ल्यातून थोडक्यात वाचले आहेत. उपमहापौरावरच गोळीबार झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, कुलभूषण पाटील (Kulbhushan Patil) आपल्या घराजवळ आले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर थेट गोळीबार (Firing) केला आहे. कुलभूषण पाटील हे आपला प्राण वाचवण्यासाठी घरात शिरले. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. म्हणून ते हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पाटील घरात गेल्यानंतर देखील त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक घराबाहेर आले असता हल्लेखोर पळून गेला आहे.

 

तसेच, या हल्ल्यानंतर कुलभूषण पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आज दुपारी शहरात क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये वाद झाला होता.
हा वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी केली होती. परंतु, हा वाद काही मिटला नाही.
शेवटी हा वाद पोलीस ठाण्यात गेला आणि तिथे वाद मिटवण्यात आला.
परंतु, या प्रकरणात एका गट संतप्त झाला होता.
या गटाने मला पोलीस (Police) ठाण्यात शिवीगाळ केली होती.
तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती कुलभूषण पाटील यांनी दिलीय.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला.
त्यावेळी कुलभूषण पाटील (Deputy Mayor Kulbhushan Patil) यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
त्या दृष्टीने पुढील पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- jalgaon crime | attempt to firing on deputy mayor kulbhushan patil in jalgaon

 

हे देखील वाचा :

Police Crime News | पोलिस दलातील महिलेचे विवस्त्र फोटो व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

Pune Rain | पुणे महापालिकेकडून नदीकाठच्या ‘या’ परिसरांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या यादी

Pune News | व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये इंडक्शन प्रोग्रॅम

 

Related Posts