IMPIMP

Jalgaon Police Officer Dead In Accident | तपासाला जाताना गाडीवर कोसळले झाड; सहायक पोलिस निरीक्षकासह चालकाचा मृत्यु

by nagesh
Jalgaon Police Officer Dead In Accident | While going to investigate, a tree fell on the car; Driver dies along with assistant police inspector

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – Jalgaon Police Officer Dead In Accident | तपासासाठी जात असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या (Jalgaon EoW) पथकाच्या गाडीवर झाड कोसळले असून त्यात सहायक पोलिस निरीक्षक, चालकाचा मृत्यु झाला. गाडीतील अन्य तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात (Erandol Gramin Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. (Jalgaon Police Officer Dead In Accident)

एरंडोल – कासोदाकडे जात असताना अंजनी धरणाजवळील रस्त्यावर गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता ही दुदैवी घटना घडली. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर (API Sudarshan Dater), चालक अजय चौधरी असे मृत्यु पावलेल्यांचे नाव आहे. चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. (Jalgaon Police Officer Dead In Accident)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात होते. अंजनी धरणालगत आले असताना रस्त्याच्या कडेचे एक झाड नेमके त्यांच्या गाडीवर पुढच्या भागात कोसळले. त्यात चालक व पुढे बसलेले सहायक निरीक्षक सुदर्शन दातीर यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे (API Yogita Narkhede) या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढले. त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Web Title : Jalgaon Police Officer Dead In Accident | While going to investigate, a tree fell on the car; Driver dies along with assistant police inspector

Related Posts