IMPIMP

Jalgaon Crime News | जळगावमध्ये तापी नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

by nagesh
Jalgaon Crime News | a young man life end by jumping into the river in jalgaon

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन   Jalgaon Crime News | जळगाव जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये यावल
तालुक्यातील कोळन्हावी येथील एका तरुणाने गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सायंकाळी 5
वाजता हि घटना घडली आहे. गणेश संजय सोळुंखे (वय-23) रा. कोळन्हावी, ता. यावल असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या
तरुणाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गणेश सोळुंखे हा कोळन्हावी या ठिकाणी आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा. सोमवारी दुपारी घरात कुणाला काहीही एक न सांगता गणेश हा थेट गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावर पोहचला आणि त्या ठिकाणी त्याने पुलावरून तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. हि गोष्ट त्या ठिकाणी गुरे चारणाऱ्यां गुरांख्यांच्या लक्षात आली. यानंतर त्याने तातडीने गावकऱ्यांना ही घटना सांगितली. यानंतर ग्रामस्थ व गुराखी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तरुणांच्या मदतीने मृतदेह तापी नदीतून बाहेर काढण्यात आला. (Jalgaon Crime News)

 

यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी त्याला मृत घोषित केले. मृत गणेश यांच्या पश्चात आई विठाबाई, वडील संजय पांडूरंग सोळुंखे आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल श्यामकांत बोरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Jalgaon Crime News | a young man life end by jumping into the river in jalgaon

 

हे देखील वाचा :

Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा; लवास रॉयल्स्, रॉयल्स् पासलकर, गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी, बाश्री ब्लास्टर्स संघ उपांत्य फेरीत

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, न्युट्रीलिशियस्, पुना क्लब, एमईएस क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत

Uddhav Thackeray | पाशवीवृत्ती संपूर्ण देशाला खावून टाकेल, बीबीसीच्या कार्यालयावरील धाडीवरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

 

Related Posts