IMPIMP

1701 Panhala | “१७०१ पन्हाळा” या ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारला भव्य सेट

by nagesh
1701 Panhala | A magnificent set erected for the historical film "1701 Panhala"

आतापर्यंतचा मराठी ऐतिहासिक सिनेमा मधील सर्वात भव्य दिव्य असा सेट उभारण्यात आलेला आहे

 

सरकारसत्ता ऑनलाइन  व्ही. एस. गोगावले प्रॉडक्शन (V. S. Gogavale Productions) निर्मित “१७०१ पन्हाळा” (1701 Panhala) या ऐतिहासिक चित्रपटाचे (Historical Film) चित्रीकरण सध्या पुण्याजवळ तळेगाव (Talegaon Pune) येथे सुरु आहे. आपला चित्रपट जास्तीत जास्त वास्तवदर्शी असावा जेणेकरून चित्रपट बघताना प्रेक्षकांना आपण तो काळ प्रत्यक्ष अनुभवत आहोत असे वाटले पाहिजे ही भावना ठेऊन निर्माते स्वप्नील गोगावले (Produced by Swapnil Gogawle) प्रचंड मेहनत घेऊन “१७०१ पन्हाळा”ची (1701 Panhala) निर्मिती करीत आहेत. त्यासाठी मराठी ऐतिहासिक सिनेमातील आतापर्यंतचा सर्वात भव्य दिव्य असा सेट उभारण्यात आलेला आहे, या सेट मागे या सिनेमाची संपूर्ण टीमची पण खूप मेहनत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अवकाळी पावसाने सध्या धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे सेटचे कुठलेही नुकसान होऊ नये आणि चित्रीकरण अखंडित सुरु राहिले पाहिजे यासाठी इंडस्ट्रिअल एरियामध्ये तब्बल २० हजार स्क्वेअर फूटापेक्षा जास्त आकाराच्या बंदिस्त शेडमध्ये हा सेट उभा केला आहे. या भव्य सेटमध्ये विविध दालने, दरबार आणि क्रोमा सेटअप उभा केला आहे, त्याबरोबरच प्रकाश योजना सुद्धा अगदी कालानुरूप वाटावी अशी केली आहे. निर्माते स्वप्नील गोगावले खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहिल्यामुळे या चित्रपटाची (1701 Panhala) निर्मिती मोठ्या स्वरूपात करणे शक्य झाल्याचे मत लेखक, दिग्दर्शक मिथलेश (Director Mithlesh) यांनी व्यक्त केले, या प्रसंगी चित्रपटाच्या सहनिर्मात्या सोमा माणिक दास (Soma Manik Das) उपस्थित होत्या.

 

 

या भव्य चित्रपटात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यासोबत संजय खापरे (Sanjay Khapre), सुशांत शेलार (Sushant Shelar), दिपाली सय्यद (Dipali Sayed), हरीश दुधाडे (Harish Dudhade), माधवी निमकर (Madhavi Nimkar), तृप्ती तोरडमल (Tripti Tordamal), वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) आणि रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) हे नामवंत कलाकार सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत, तर संगीतकार अमित राज यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. “१७०१ पन्हाळा” चे चित्रिकरण डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणार असून चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- 1701 Panhala | A magnificent set erected for the historical film “1701 Panhala”

 

हे देखील वाचा :

Jaydutt Kshirsagar | मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेनं केलं बेदखल

MLA Vaibhav Naik | दिवाळीच्या उत्सवात कोकणातलं राजकीय वातावरण तापलं, वैभव नाईकांनी दिलं निलेश राणेंना ‘हे’ आव्हान

Ambadas Danve | उद्धव ठाकरेंना घाबरुन ते तिघे एकत्र येतील, पण…, ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या भेटीवर अंबादास दानवेंचा टोला

 

Related Posts