IMPIMP

MLA Vaibhav Naik | दिवाळीच्या उत्सवात कोकणातलं राजकीय वातावरण तापलं, वैभव नाईकांनी दिलं निलेश राणेंना ‘हे’ आव्हान

by nagesh
MLA Vaibhav Naik | maharashtra politics shivsena thackeray faction mla vaibhav naik challenge bjp leader nilesh rane contest assembly election

कुडाळ : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Vaibhav Naik | सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे तळ कोकणात मोठा वाद पेटला आहे. राणे कुटुंबीय (Narayan Rane) विरुद्ध शिवसेनेचा ठाकरे गट (Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) समोरासमोर आले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी थेट भाजप नेते निलेश राणेंना (Nilesh Rane) विधानसभेत त्यांच्या विरोधात उभे राहण्याचे आव्हान केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) म्हणाले, भाजपने संविधान रॅली काढून (BJP Samvidhan Rally) संविधानाच्या विरोधात भूमिका घेत आहे. भाजपसोबत येत नाहीत, त्यांना ते तुरुंगात टाकत आहेत. भाजपच्या रॅलीत जे लोक होते, ते भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांच्यात गेले होते. मला देखील भाजपमध्ये खेचण्यासाठी दबावतंत्र वापरत आहेत. पण मी त्याला भीक घालणार नाही. मी चौकशीला सामोरे जाणार आहे. मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशेबी आढळला, तर मला फाशी द्या, असे मी जाहीर आवाहन देतो. निलेश राणे आणि नारायण राणेंनी दबावाखाली येऊन किती पक्ष बदलेले? आम्ही मात्र कोणाचे मिंधे नाही. त्यामुळे आम्ही लोकांसमोर ठामपणे जात आहोत.

 

निलेश राणेंनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभे रहावे. नारायण राणेंचा 2014 साली विधानसभेत पराभव
केला. निलेश राणेंनी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहून दाखवावे, त्यांचा देखील पराभव करु, असे आमदार नाईक म्हणाले.

 

वैभव नाईक यांच्यावर लाचलुचपत विभागाची (ACB) कारवाई सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या मागे शिवसेना
(ठाकरे गट) एकवटली आहे. चार दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यात वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant), आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav)
आदी नेत्यांनी भाषणे दिली होती. भास्कर जाधव यांनी यावेळी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) आणि नारायण राणे (Narayan Rane) कुटुंब यांच्यावर आगपाखड करत आरोप केले
होते. यावेळी त्यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका देखील केली होती.
त्यानंतर भाजपने कुडाळ तालुक्यात संविधान रॅली काढून सेनेला प्रत्युत्तर दिले होते.
यावेळी निलेश राणेंनी भास्कर जाधव यांना पाय तोडण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून हा वाद चिघळला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  MLA Vaibhav Naik | maharashtra politics shivsena thackeray faction mla vaibhav naik challenge bjp leader nilesh rane contest assembly election

 

हे देखील वाचा :

Ambadas Danve | उद्धव ठाकरेंना घाबरुन ते तिघे एकत्र येतील, पण…, ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या भेटीवर अंबादास दानवेंचा टोला

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे सोपं नाही, कारण…, आ. रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

Narayan Rane | उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपूरते मर्यादीत, नारायण राणेंचे टीकास्त्र

Pune Crime | समर्थ आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे, 18 जणांवर कारवाई

 

Related Posts