IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकते DA वाढीची भेट, असे करा कॅलक्युलेट

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission news central gov employees on da dearness allowance detail here

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्त्याच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत
आहेत. यावर अंतिम निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समिती घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, DA/DR दरवाढ केव्हा होईल
याबद्दल कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. (7th Pay Commission)

 

 

साधारणपणे मार्च आणि सप्टेंबर महिन्यात DA/DR वाढ जाहीर केली जाते. सप्टेंबर महिना सुरू असून सण येणार असल्याने केंद्रीय कर्मचारी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अशी अटकळ बांधली जात आहे की या महिन्यात कधीही त्याची घोषणा होऊ शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

किती वाढू शकतो DA

DA मध्ये वाढीचा दर सध्याच्या दराच्या 34% ते 38% पर्यंत असू शकतो अशी अपेक्षा आहे.
पेन्शनधारकांसाठी डीआर दरवाढही अशीच अपेक्षित आहे.

 

 

डीए वाढीची गणना कशी करावी

सरकार सामान्यपणे दर 6 महिन्यांनी DA/DR वाढीची गणना करते. जानेवारी आणि जुलै हे महिने यासाठी अनुकूल आहेत. 2006 पासून, महागाई भत्ता नवीन गणनेवर होत आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी DA ची टक्केवारी = [(गेल्या 12 महिन्यांतील ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्सची (AICPI) सरासरी –
115.76/115.76]×100.

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्याची टक्केवारी = (गेल्या 3 महिन्यांतील कन्झ्युमर प्राईस इंडेक्सची सरासरी (बेस ईयर 2001=100)-126.33))x100

 

 

DA वर भरावा लागतो टॅक्स

डीए देखील कराच्या कक्षेत येतो. आयटीआरमध्ये याचा हिस्सा स्वतंत्रपणे भरावा लागतो. यासाठी दोन कॅटेगरी आहेत. पहिली औद्योगिक महागाई भत्ता आणि दुसरी व्हेरिएबल महागाई भत्ता.

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da hike expected date for dearness allowance

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | ‘लव्ह जिहाद’वरुन खासदार नवनीत राणा पोलीस ठाण्यात आक्रमक; दोन तासात मुलीचा शोध घ्या, राणांचा पोलिसांना अल्टिमेटम (व्हिडिओ)

Pune Crime | लोहगाव येथे मटका अड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 12 जणांवर कारवाई

Best Multibagger Stock 2022 | शेअर बाजाराच्या वाटचालीवर मात करणारा स्टॉक, वर्षभरात पैसे झाले दुप्पट

 

Related Posts