IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी ! DA मध्ये भरघोस वाढ, कॅबिनेटमध्ये झाली घोषणा

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission da hike update govt increased 3 percent da in today cpc latest news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission | केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी (Central Government Employees And Pensioners) एक आनंदाची बातमी आहे. आज, बुधवार, 30 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए (Dearness Allowance Hike) मध्ये 3% वाढ मंजूर करण्यात आली आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कर्मचार्‍यांचा डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला आहे. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कॅबिनेट बैठकीत घेतला निर्णय
AICPI-IW च्या डिसेंबरच्या डेटापासून कर्मचारी 3% डीए वाढीच्या घोषणेची वाट पाहत होते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3% डीए वाढीची (DA Hike) घोषणा करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांच्या मार्च महिन्याच्या पगारात नवीन डीए खात्यात जमा केला जाईल.

 

 

3% वाढ होती निश्चित
आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (डीए वाढ) मिळेल. औद्योगिक कामगारांसाठी (AICPI निर्देशांक) डिसेंबर 2021 च्या ग्राहक मूल्य निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. (7th Pay Commission)

महागाई भत्त्याच्या 12 महिन्यांच्या निर्देशांकाची सरासरी 34.04% (Dearness allowance) सह सरासरी 351.33 आहे. परंतु, महागाई भत्ता नेहमी पूर्ण संख्येने दिला जातो. म्हणजेच जानेवारी 2022 पासून एकूण महागाई भत्ता 34% असेल.

 

 

AICPI – IW डिसेंबरमध्ये घसरला
विशेष म्हणजे सरकारच्या या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. यानंतर आता पुढील महागाई भत्ता जुलै 2022 मध्ये मोजला जाईल.

डिसेंबर 2021 साठी AICPI – IW (All India Consumer Price Index for Industrial Workers) डेटा जारी करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये हा आकडा 0.3 अंकांनी घसरून 125.4 अंकांवर आला. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 125.7 अंकांवर होता. आणि डिसेंबरमध्ये 0.24% ने घटली. परंतु, याचा महागाई भत्त्यावरील वाढीवर परिणाम झालेला नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नोव्हेंबरमध्ये झाली होती वाढ
कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, AICPI-  IW निर्देशांक नोव्हेंबर 2021 मध्ये 0.8% वाढला होता आणि 125.7 वर पोहोचला होता. यावरून महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले. आता, डिसेंबर 2021 च्या आकड्यात थोडीशी घट झाली असली तरी, जानेवारी 2022 पासून डीएमध्ये 3% वाढ जाहीर करण्यात आली आहे.

 

DA Calculator from July 2021

महिन्याचे गुण डीए टक्केवारी

जुलै 2021 353 31.81%

ऑगस्ट 2021 354 32.33%

सप्टेंबर 2021 355 32.81%

नोव्हेंबर 2021 362.016 33 %

डिसेंबर 2021 361.152 34%

 

DA अंकाची गणना

जुलैसाठी कॅलक्युलेशन – 122.8 X 2.88 = 353.664

ऑगस्टसाठी कॅलक्युलेशन – 123 X 2.88 = 354.24

सप्टेंबरसाठी कॅलक्युलेशन – 123.3 X 2.88 = 355.104

नोव्हेंबरसाठी कॅलक्युलेशन – 125.7 X 2.88 = 362.016

डिसेंबरसाठी कॅलक्युलेशन – 125.4 X 2.88 = 361.152

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

34% डीए वर कॅलक्युलेशन

आता 3% महागाई भत्ता वाढल्याने कर्मचार्‍यांचा डीए 34% झाला आहे. आता त्याची किमान आणि कमाल मूळ वेतनाची गणना येथे पाहू.

किमान मूळ पगारावर कॅलक्युलेशन

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000

2. नवीन महागाई भत्ता (34%) रु. 6120/महिना

3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (31%) रु.5580/महिना

4. किती वाढला महागाई भत्ता 6120- 5580 = रु 540/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 540X12 = रु. 6,480

 

कमाल बेसिक सॅलरीवर कॅलक्युलेशन

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन – रु. 56900

2. नवीन महागाई भत्ता (34%) – रु.19346/महिना

3. आतापर्यंतचा महागाई भत्ता – (31%) रु. 17639/महिना

4. किती महागाई भत्ता वाढला – 19346-17639 = रु. 1,707/महिना

5. वार्षिक पगारात वाढ – 1,707 X12 = रु. 20,484

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da hike update govt increased 3 percent da in today cpc latest news

 

हे देखील वाचा :

Urvashi Rautela Superhot Photo | उर्वशी रौतेलानं डीप नेकचा ड्रेस घालून चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, पाहा व्हायरल फोटो

Pune Police | ‘खऱ्या हिरोंना माझा मानाचा मुजरा’ ! पुण्यातील खाकी वर्दीतील ‘रिअल स्टोरी’ अभिनेत्रीनं केली शेअर

Bad Breath Problem | तोंडाच्या दुर्गंधीपासून करायचा असेल बचाव तर ‘या’ गोष्टींपासून राहा दूर, असा मिळवा श्वासाचा ताजेपणा

 

Related Posts