IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ! 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; 4500 रुपयांचा थेट लाभ, जाणून घ्या

by nagesh
DA Arrear | 7th pay commission da arrear latest update 18 months dearness allowance arrear payment option settlement

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | देशातील केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) एक महत्वाची माहिती आहे. वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई सवलत (DR) मिळाल्यानंतर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता आणखी एक भत्ता मिळू शकणार आहे. दरम्यान जे कर्मचारी कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) बालशिक्षण भत्यासाठी (CEA) दावा करू शकले नाहीत. अशासाठी 31 मार्च 2022 आधी त्याबाबतचा दावा करता येणार आहे. (7th Pay Commission)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता देखील मिळतो. जो सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशींनुसार प्रतिमहिना 2 हजार 250 रुपये आहे. पण, मागील वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी सीईएवर (CEA) दावा करू शकले नाहीत. त्यामुळे त्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली होती. म्हणून आता अंतिम मुदती आगोदर CEA दावा करु शकते.

 

दरम्यान, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सचा (Children’s Education Allowance) दावा करण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना शाळेचे प्रमाणपत्र व दावा कागदपत्रे सादर करावी लागतात. कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक वर्षाची माहिती द्यावी. त्याचबरोबर फी आणि इतर आवश्यक डॉक्युमेट जोडले जावे.

 

स्वघोषणा देणे गरजेचे –
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) ऑफिस ऑफ मेमोरंडम (OM) जारी केला.
कोरोनामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षण भत्त्यावर दावा करण्यात अडचणी येत आहेत.
कारण, फी ऑनलाइन जमा केल्यानंतरही शाळेकडून एस एम एस/ई-मेलद्वारे निकाल/रिपोर्ट कार्ड पाठवले गेले नाहीत.
असं त्यामध्ये म्हटले होते. दरम्यान, शैक्षणिक भत्त्यासाठीचा दावा विद्यार्थ्यांचे निकाल/रिपोर्ट कार्ड/फी पेमेंट एसएमएस/ई-मेलच्या प्रिंट आउटच्या माध्यमातूनही केला जाऊ शकतो. ही सुविधा फक्त मार्च 2020 आणि मार्च 2021 मध्ये संपणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध असणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भत्ता किती मिळणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 मुलांच्या शिक्षणासाठी बालशिक्षण भत्ता मिळतो, प्रति पाल्य हा भत्ता 2 हजार 250 रुपये दर महिना मिळतो.
अर्थात कर्मचाऱ्यांना 2 मुलांसाठी दरमहा 4 हजार 500 रुपये मिळतात.
परंतु, जर दुसऱ्यांदा जुळे बालकं झाली असतील तर पहिल्या अपत्यासह जुळ्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील हा भत्ता दिला जातो.

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission latest update govt employees do children education allowance claim before 31 march here is process

 

हे देखील वाचा :

Girish Bapat | पुरंदर, बारामती विमानतळाला विरोध नाही, पण पुण्यातील लोहगाव विमानतळ कुठेही हलवणार नाही – गिरीश बापट

CP Krishna Prakash | पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई ! तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि हप्ता वसुल करणाऱ्या कर्मचाऱ्याची केली उचलबांगडी

Pune Crime | HDFC बँकेत अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 12 लाखांची फसवणूक, 2 महिलांसह तिघांवर FIR

 

Related Posts