IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ 4 भत्त्यांमध्ये वाढ होणार, सॅलरीमध्ये होईल बंपर वाढ

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission news central gov employees on da dearness allowance detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | तुम्हीही केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नुकताच महागाई भत्ता 3% ने वाढवला आहे. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 34 टक्के आहे. AICPI ची आकडेवारी पाहता कर्मचार्‍यांच्या वेतनात 3 ते 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यासोबतच इतरही अनेक भत्ते वाढणार आहेत. वास्तविक, सरकार कर्मचार्‍यांचे इतर चार भत्ते वाढविण्याच्या विचारात आहे. सरकारने या भत्त्यांवर शिक्कामोर्तब केल्यास कर्मचार्‍यांच्या पगारात बंपर वाढ होईल. या भत्त्यांबाबत जाणून घेवूयात…

 

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात Dearness Allowance (DA) यापूर्वीच 3 टक्के वाढ करण्यात आली आहे (DA Hike). आता पुन्हा एकदा कर्मचार्‍यांचा डीए वाढवण्यात येणार आहे. AICPI च्या आकडेवारीवरून पुन्हा एकदा कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (7th Pay Commission)

 

महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता कर्मचार्‍यांचा प्रवास भत्ता (Travel Allowance) आणि शहर भत्ता (City Allowance) वाढणार आहे. वास्तविक, डीए वाढल्यानंतर टीए आणि सीएमध्ये वाढ निश्चित झाली आहे. कारण, डीए वाढल्यानंतर टीए आणि सीएमध्ये वाढ होते.

 

भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटी (Gratuity) देखील वाढणार आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ पगार आणि डीएमधून मोजली जाते. अशावेळी महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढण्याची खात्री आहे. जुलैपूर्वी त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

18 महिन्यांच्या थकबाकीसाठी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या संघटनाही सरकारवर दबाव आणत आहेत.
पगार आणि भत्ता हा कर्मचार्‍यांचा हक्क आहे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.
अशावेळी कर्मचार्‍यांना 18 महिन्यांच्या थकबाकीचा लाभही मिळू शकतो.

 

डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचार्‍यांचा घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय कर्मचार्‍यांना एकाच वेळी चार भत्त्यांमध्ये वाढीचा लाभ मिळू शकतो.
वास्तविक, केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए नऊ महिन्यांत दुप्पट झाला आहे. आता जुलैमध्ये पुन्हा डीए वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission news central govt employees da hike epfo gratuity may increase know cpc latest news

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या

Maharashtra MLC Elections 2022 | भाजपची करेक्ट खेळी ! रोहित पवारांना आव्हान देण्यासाठी ‘या’ नेत्याला उमेदवारी

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळणारा खासगी सावकार गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Related Posts