IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 8 व्या वेतन आयोगासंदर्भात Govt सकारात्मक की नकारात्मक? सरकार लवकरच पगारासाठी नवीन फॉर्म्युला आणणार

by Team Deccan Express
7th Pay Commission | 7th pay commission update no more pay commissions for central govt employees in future cpc latest news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Govt Employees) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) मिळत आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारही सातव्या वेतन (Salary) आयोगाअंतर्गत केले जात आहेत. दरम्यान, आता नव्या निर्णयानुसार सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देणार आहे.

 

सरकार अजुन तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग (8 वा वेतन आयोग) आणण्याचा विचारात नाही. आता सरकार अशा प्रणालीवर काम करत आहे ज्याच्या माध्यमातून कर्मचार्‍यांचे पगार त्यांच्या परफॉमन्सच्या आधारावर ठरवले जातील. अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) सूत्रांकडून मिळाली आहे.

सातव्या वेतन आयोगानंतर आता पुढील वेतन (Salary) आयोग येणे कठीण आहे.
सरकारला आता अशी प्रणाली आणायची आहे ज्यामध्ये 68 लाख केंद्रीय कर्मचारी
आणि 52 लाख निवृत्ती वेतनधारकांचा डीए 50 टक्के पेक्षा अधिक असल्यास पगारात ऑटोमैटिक रिविजन होईल.
सरकारला यासाठी ‘ऑटोमैटिक पे रिविजन सिस्टम’ (Automatic Pay Revision System) बनवायची आहे.
असे वृत्त एका चॅनेलने दिले आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नवीन फॉर्म्युला आणला जाऊ शकतो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission update no more pay commissions for central govt employees in future cpc latest news

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts