IMPIMP

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Aadhaar Card Security | aadhaar card use these services to secure personal data on aadhaar card know detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआधार (Aadhaar Card) आजच्या काळात ओळखीचा सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहे. याच्याशिवाय आपण कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. बँकेत खाते उघडण्यापासून अनेक कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. तुमचे आधार तुमच्या पॅनशी लिंक केलेले नसेल तर, तुमचे पॅन निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे आधार आता प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. आता आधारमध्ये नावापासून पत्त्यापर्यंत दुरुस्त्या करणे सोपे झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तुमच्या आधारमध्ये तुमचे नाव किती वेळा बदलू शकता ? (Aadhaar Card)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकदाच जारी होते आधार

आधार क्रमांक कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच दिला जातो. हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डमध्ये 12 – अंकी यूनिक क्रमांक असतो, ज्यावरून संबंधित नागरिकाची माहिती समोर येते. त्यात पत्ता, पालकांचे नाव, वय यासह विविध माहिती असते. आधारमध्ये कोणतीही माहिती चुकीची टाकली गेली असेल तर ती बदलली जाऊ शकते. मात्र यासाठी यूआयडीएआयने मर्यादा निश्चित केली आहे. (Aadhaar Card)

 

किती वेळा बदलू शकता नाव

UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. UIDAI नुसार, आधार कार्डधारक आयुष्यात फक्त दोनदा नाव बदलू शकतो. तसेच, तुम्ही आधारमध्ये तुमची जन्मतारीख फक्त एकदाच बदलू शकता. आधार डेटामध्ये तुम्ही तुमचे नाव वारंवार बदलू शकत नाही. तुम्ही आयुष्यात फक्त एकदाच आधारमध्ये जेंडरची माहिती अपडेट करू शकता.

 

नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक

आधारमध्ये कोणत्याही प्रकारचे अपडेट करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या. त्यानंतरच तुम्ही तुमच्या आधार डेटामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू शकता. लक्षात ठेवा की नाव, पत्ता किंवा जेंडर संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा नोंदणीकृत फोन नंबर असणे आवश्यक आहे. कारण त्यावरील ओटीपी शिवाय तुम्ही तुमच्या आधार डेटामध्ये कोणताही बदल करू शकत नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ऑनलाइन कसे बदलावे नाव

स्वत: च्या नावामध्ये बदल करण्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करा.

त्यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो भरा.

लॉगिन केल्यानंतर, होमपेजवर जा आणि प्रोसीड टू अपडेट आधार वर क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

नंतर नाव बदलण्याचा (Name change) पर्याय निवडा आणि आधारभूत दस्तऐवज स्कॅन करा आणि अटॅच करा.

त्यानंतर सबमिट करा आणि ’सेंड ओटीपी’ हा पर्याय निवडा.

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. तो भरा.

ओटीपी भरल्यानंतर, तुमचा नाव बदलण्याचा अर्ज सबमिट केला जाईल.

 

Web Title : –  Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Related Posts