IMPIMP

Aaditya Thackeray | मला तर आता मळमळायला लागले आहे, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

by nagesh
Gujarat Election results | gujarat assembly election 2022 shiv sena chief uddhav thackeray congratulates bjp for gujarat victory wishes congress for himachal victory

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकास्त्र सोडले आहे. शिंदे सरकारचे राजकीय फ्लेक्स पाहून मला तर आता मळमळायला लागले आहे, असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खोके सरकार अजून देखील राजकारण (Maharashtra Politics) करत आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी अद्याप मदत केली नाही. या सरकारमध्ये खरे मुख्यमंत्री कोण आहेत? हे सरकारच मुळी घटनाबाह्य आहे. त्यामुळे घटनाबाह्य सरकारने कामेही करायची असतात, हे त्यांना अजून कळाले नाही. राज्यात फक्त राजकीय घोषणा दिल्या जात आहेत. जनतेचा आवाज कुठेही ऐकायला येत नाही. 40 दिवसांनी पहिल्यांदा मंत्र्यांची यादी जाहीर झाली होती. पालकमंत्री (Guardian Minister) जाहीर करण्यापूर्वीच बंगल्यांचे वाटप झाले होते. हे सरकार घटनेच्या विरोधात आहे, हे मान्य करायला हवे. घटनाबाह्य सरकार निर्णय घेत आहे, हे दुर्दैवी आहे, असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  म्हणाले. ते मुंबईत ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमात बोलत होते.

 

तसेच या सरकारला घोषणा सरकार, खोके सरकार अशी नावे मिळाली आहेत. पण यांना कोणतीही लाज वाटत नाही.
काम करणे गरजेचे आहे, हे ते विसरून गेले आहेत. राज्यातील प्रत्येक महामंडळाच्या बस स्थानकावर शिंदे सरकारचे
(Shinde Government) फ्लेक्स लागले आहेत. यासाठी त्यांनी पैसे दिले आहेत की नाही? हे अजून माहीत नाही.
दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हे माहीत नाही.
शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. पण महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही.
एवढे सगळे राजकीय फ्लेक्स पाहून मला मळमळायला लागले आहे, असे ठाकरे म्हणाले.

 

 

Web Title :-  Aaditya Thackeray | shivsena thackeray faction aditya thackeray on maharashtra government eknath shinde devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | राष्ट्रवादी काँग्रेसचे सडेतोड प्रत्युत्तर, शंभूराज देसाईंचा विजय शिवतारे होईल

Cold Nose Treatment | अखेर हिवाळ्यातील थंडीत नाक का होते थंड, जाणून घ्या कारण आणि बचावाचे उपाय

Energy Giving Foods | एनर्जीच्या पॉवरहाऊस आहेत ‘या’ 9 गोष्टी, हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर होत नाही सुस्त

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ठरविली

 

Related Posts