IMPIMP

Aditya Thackeray | एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदित्य ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

by nagesh
 Aditya Thackeray | the government will collapse two or three months aditya thackeray accusation against shinde group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेना (Shivsena) पक्षात तिच्या स्थापनेपासून अनेक बंड झाले. यात छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचे
बंड आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचे बंड झाले. पण यावेळी पक्षाला फारसा फरक पडला नाही. पण यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे
(Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात जे मोठे न भुतो न भविष्यती बंड झाले, त्याने शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत
कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, तर शिवसेना पक्षावरच दावा केला. त्यामुळे शिवसेनेला कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागत आहे. शिवसेना
विरुद्ध एकनाथ शिंदे यांचे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आणि केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) अनेक
खटले प्रलंबित आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya
Thackeray) यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत हे बंड होणार याची कुणकुण आम्हाला दीड-दोन
वर्षे आधीच लागली होती, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमच्या घरात साधारण एक ते दीड वर्षापूर्वी याविषयी चर्चा झाली होती. या सर्व प्रकारची कुणकुण आमच्यापर्यंत पोहोचली होती. मागील वर्षी मी दावोस दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना घरी बोलावून घेतले होते आणि त्यांना, ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का?’ असा थेट प्रश्न विचारला होता. तसेच नक्की काय गडबड सुरु आहे, असे देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारण्यात आले होते, असे आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सांगितले.

 

आम्ही एखाद्यासोबत काम करतो, त्यावेळी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो.
अनेक लोकांकडून आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या.
मात्र, ते लोक आम्हाला चुकीच्या गोष्टी सांगून आमच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत ना,
असा विचार करुन आम्ही दुर्लक्ष केले. पण आता त्यांच्या बातम्या खऱ्या होत्या हे सिद्ध झाले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

 

Web Title :- Aditya Thackeray | uddhav thackeray shivsena leader aditya thackerays new revelation about rebel mlas and cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | भारतासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ गोलंदाज ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

Sanjay Raut | प्रिय आई, जय महाराष्ट्र; संजय राऊतांचे आर्थर रोड तुरुंगातून आईला पत्र, म्हणाले-‘…म्हणून मला तुझ्यापासून दूर जावे लागत आहे’

Kishori Pednekar | महापालिकायुक्त बंदुकीच्या धाकावर काम करत आहेत, किशोरी पेडणेकर यांचा गंभीर आरोप

 

Related Posts