IMPIMP

T20 World Cup | भारतासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ गोलंदाज ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

by nagesh
T20 World Cup | india vs england semi final rohit sharma could make one change

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे संघाच्या बाहेर गेल्यामुळे भारताला गोलंदाजी बाजूची फार चिंता सतावत होती. यानंतर भारतीय संघ पंधराव्या खेळाडूविना ऑस्ट्रेलियासाठी (Australia) रवाना झाला. यानंतर आता भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammed Shami) ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. (T20 World Cup)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोहम्मद शमीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy), बेंगळुरू येथे त्याची फिटनेस चाचणी पास केली असून तो आता ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.
शमीचा विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता.
परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) घरच्या मालिकेमुळे आणि त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो मुख्य संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही.
तसेच शार्दुल ठाकूर उद्या ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचेसुद्धा समोर आले आहे.
गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) आयपीएल 2022 (IPL 2022) चे चॅम्पियन बनवण्यात मोहम्मद शमीची महत्वाची भूमिका होती. (T20 World Cup)

 

 

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा,
ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल,
भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

 

 

Web Title :- T20 World Cup | t 20 world cup 2022 team indias bowler mohammad shami passed his fitness and ready to fly austrlia

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | प्रिय आई, जय महाराष्ट्र; संजय राऊतांचे आर्थर रोड तुरुंगातून आईला पत्र, म्हणाले-‘…म्हणून मला तुझ्यापासून दूर जावे लागत आहे’

Kishori Pednekar | महापालिकायुक्त बंदुकीच्या धाकावर काम करत आहेत, किशोरी पेडणेकर यांचा गंभीर आरोप

Pune Bus Fire | नाशिकनंतर पुण्यात खासगी बस पेटली, बस चालकाच्या तत्परतेमुळे 27 प्रवासी बचावले

 

Related Posts