IMPIMP

Ahmadnagar Accident News | देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 ठार तर 11 जखमी

by nagesh
Ahmadnagar Accident News | four devotees who were visiting god at shanishinganapur and devgad died 11 injured in accident on the day of gudhipadva

अहमदनगर :  सरकारसत्ता ऑनलाईन – गुढीपाडव्याच्याच दिवशी अहमदनगरमध्ये (Ahmadnagar Accident News) भीषण अपघाताची घटना घडली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यात कामरगाव शिवारात हा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात देवदर्शन करून परतणाऱ्या 4 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व भाविक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत. हे भाविक नगर जिल्ह्यात (Ahmadnagar Accident News) शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?
पुण्यातील शिरूर तालुक्यातील अहमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील 16 जण एका टेम्पोमधून देवदर्शनाला गेले होते. यादरम्यान नगर-पुणे महामार्गावर (Nagar-Pune Highway) कामगारगावाजवळ पुण्याकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला.

 

या अपघातात राजेंद्र साळवे (Rajendra Salve), विजय अवचिते (Vijay Awachite), धीरज मोहिते
(Dheeraj Mohite), मयूर साळवे (Mayur Salve) या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी
झाले. यामध्ये जखमींना उपचारासाठी नगर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर त्यांनी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.
मृत पावलेल्यांमध्ये एका लहान मुलाचादेखील समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ahmadnagar Accident News | four devotees who were visiting god at shanishinganapur and devgad died 11 injured in accident on the day of gudhipadva

 

हे देखील वाचा :

Chandrapur Crime News | खळबळजनक ! पहाटेच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना आढळले दोघांचे मृतदेह

Pune Crime News | पुण्यातील ओशो आश्रमाच्या परिसरात गोंधळ घालणार्‍या तब्बल 130 अनुयायांच्याविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा

Chandrapur Crime News | माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्यासह आणखी एकाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; चंद्रपूरमधील घटना

 

Related Posts