IMPIMP

Ahmednagar Crime | पोलिस दलातून ‘हकालपट्टी’ झालेल्या सहायक निरीक्षकाकडून श्रीरामपूरचे SDPO संदिप मिटके यांच्यावर गोळीबार

by nagesh
Ahmednagar Crime | firing on shrirampur sub divisional police officer sandeep mitke by suspended or dismissed api sunil lokhande

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Ahmednagar Crime | राहुरी तालुक्यातील (Rahuri Crime) दिग्रस येथे पोलिस दलातून हकालपट्टी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाने (API) जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या वैशाली नानोर (Vaishali Nanor) यांच्या मुलांना रिव्हॉलल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले. मुलांची सुटका करण्यासाठी गेलेले श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके (shrirampur sub divisional officer sandeep mitke) यांच्यावर आरोपीने गोळीबार (Firing on SDPO) केला. गोळीबाराच्या या घटनेत पोलीस उपविभागीय अधिकारी मिटके थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ (Ahmednagar Crime) उडाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ही घटना आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. आरोपी सुनिल लोखंडे (API Sunil Lokhande) या सहाय्यक निरीक्षकाची पोलिस
दलातून काही वर्षांपुर्वी हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तो पुर्वी पुणे शहर पोलिस दलात तसेच एसपीयुमध्ये कार्यरत होता. त्याने गुरुवारी सकाळी
सात वाजेच्या सुमारास नानोर यांच्या घरात प्रवेश केला. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना डांबून ठेवले. आरोपीने त्यांच्या डोक्याला रिव्हाल्वर
(Pistol) रोखून धरले होते. नानोर यांनी प्रसंगावधान राखत मोबाईलवरुन ओळखीच्यांना या घटनेची माहिती दिली. (Ahmednagar Crime)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. SDPO मिटके हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरु होते. अखेर त्यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली, ती उपधीक्षकांच्या डोक्या जवळून गेली. मिटके हे यामध्ये थोडक्यात बचावले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे (Additional Superintendent of Police Deepali Kale) हे घटनास्थळी दाखळ झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी नानोर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने खंडणी (Ransom) मागितली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी हे कृत्य आरोपीने केल्याचे समजले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :- Ahmednagar Crime | firing on shrirampur sub divisional police officer sandeep mitke by suspended or dismissed api sunil lokhande

 

हे देखील वाचा :

IBPS | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारी बँकांमध्ये 7855 क्लर्क पदांसाठी आयबीपीएसकडून आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या

Pune Police Crime Branch | पुण्यातील व्यापार्‍याकडे 2 लाखाच्या खंडणीची मागणी; हॉटेल ‘हयात रिजेन्सी’ मध्ये विशाल उर्फ जंगल्या सातपुतेसह तिघांना अटक

Gold Price Today | खुशखबर ! नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरही सोन्याच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या

 

Related Posts