IMPIMP

Ajit Pawar | कोर्टाच्या निकालावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मी दिल्लीला…’

by nagesh
Ajit Pawar | ajit-pawar-reaction-to-the-court-verdict-of-shiv-sena-and-shinde-group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला
आहे. या निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. मी
माहिती घेतो, मला निकाल पत्र वाचण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही. मी उद्या बोलतो. फक्त मी दिल्लीला गेलो नाही
एवढेच सांगा, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

 

बुधवारी कोर्टाच्या निकालापूर्वी बोलताना अजित पवार यांनी लातूरमध्ये म्हटले होते की, जरी 16 आमदार अपात्र (MLA Disqualified) झाले तरी सरकारकडे बहुमत असेपर्यंत सरकारला कोणताही धोका नाही. त्याचाच पुनरुच्चार आज पुण्यात बोलताना अजित पवार यांनी केला. मी बोललो त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. मला जे वाटले ते बोललो आणि तसा निकाल सुद्धा आलेला आहे. पणी आणखी निकालाची प्रत वाचलेली नाही. त्यामुळे मी यावर बोलणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी निकालपत्र वाचून सविस्तर भूमिका मांडेन. मला जे काही या अनुषंगाने बोलायचंय ते बोलेन.
कृपा करुन फक्त मी दिल्लीला वगैरे चाललोय असं सांगू नका, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांची फिरकी घेतली.
अजित पवार पुणे विमानतळावर (Pune Airport) पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या शैलीत पत्रकारांना उत्तर दिलं.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit-pawar-reaction-to-the-court-verdict-of-shiv-sena-and-shinde-group

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – डेक्कन येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 30 हजाराच्या लाच प्रकरणी सरपंच,
उप सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 16 आमदारांचा निर्णय कधी, कशी अशी असेल प्रक्रिया?
विधानसभा अध्यक्षांनी लंडनमधून दिली माहिती

Pune Cyber Police Crime News | पुणे सायबर पोलिस क्राईम न्यूज : विमा पॉलिसीच्या बहाण्याने 2 कोटींचा
गंडा घालणार्‍याला दिल्लीतून अटक

 

Related Posts