IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांनी ट्विटर आणि Facebook वरुन हटवलं राष्ट्रवादीचे चिन्ह

by nagesh
Ajit Pawar | Ajit Pawar removed NCP symbol from Twitter and Facebook

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय
वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार यांच्याकडे 53 पैकी 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने
दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्ष चिन्हाचा फोटो हटवला (Removed Party Symbol) आहे. त्यांनी
आपल्या ट्विटर (Twitter) आणि फेसबुक (Facebook) अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो (NCP Logo) हटवल्याचं समोर आलं आहे. मात्र NCP चं नाव
कायम ठेवलं आहे.

 

अजित पवार यांनी फेसबुकवरुनही चिन्ह हटवलं आहे. फेसबुकवर फक्त अजित पवार यांचा स्वत:चा फोटो दिसत आहे. त्यांच्या प्रोफाईलचा वॉलपेपरही (Profile Wallpaper) हटवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह देखील हटवल्याचं दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे बंद दाराआड चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते सर्वकाही सुरळीत आणि चांगलं सुरु असल्याचं सांगत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं चाललयं तरी काय? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.

 

सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे – शरद पवार

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करत आहे. त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कोणताही विचार कुणाच्या मनात नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar removed NCP symbol from Twitter and Facebook

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशन – आई मारते म्हणून तीन लहान मुले घरातून गेली निघून; चार तासांच्या प्रयत्नानंतर कॅम्पात सापडली सुखरुप

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

 

Related Posts