IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | ncp sharad pawar reacts on ajit pawar joining government claims

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन -अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असलेल्या चर्चांवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP
Chief Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नाराज ही केवळ तुमच्या मनातील चर्चा आहे. राष्ट्रवादीमध्ये सर्व काही
अलबेल आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही, असे देखील शरद पवार (NCP Chief Sharad
Pawar) यांनी स्पष्ट केलं.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करत आहे. त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कोणताही विचार कुणाच्या मनात नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यानंतर माझा देहूला कार्यक्रम आहे. त्यानंतर रात्री मुक्कामाला मी मुंबईला जाणार आहे. मी वर्तमानपत्रात वाचलं की आमदारांची बैठक (MLA Meeting) वगैरे. 100 टक्के ही खोटी गोष्ट आहे. अशी कोणतीही बैठक नाही. पक्षाचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या (Market Committee Election) प्रचारात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत. याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी कुणावरही नाही. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करत आहे. मी या सगळ्यावर स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

 

 

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | ncp sharad pawar reacts on ajit pawar joining government claims

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

Harshad Dhage – Pune News | समाजसेवक ‘हर्षद ढगे’, ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत करतोय पर्यावरणाचं रक्षण

Pune Crime News | पुणे-वारजे माळवाडी क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – पूर्ववैमनस्यातून गुंडांचा तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Political News | अजितदादा भाजपसोबत जाणार? राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले – ‘परिस्थितीनुसार निर्णय…’

 

Related Posts