IMPIMP

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

by nagesh
Ajit Pawar | ajit pawars reaction regarding mahavikas aghadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून आपल्या जिवाला
धोका असल्याची तक्रार भाजपचे (BJP) पदाधिकारी रवींद्र साळगावकर (Ravindra Salgaonkar) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police
Station) दिली आहे. साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, होय, माझ्याकडून
त्यांना धोका असू शकतो. पण तो राजकीय धोका (Maharashtra Politics News) असू शकतो. पण शारीरिक धोका असू शकत नाही, असे अजित
पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी कायदा व सुव्यवस्था (Law and Order) आणि संविधान (Constitution) पाळणारा माणूस आहे. माझ्याकडून धोका असण्याच काहीच कारण नाही, माझ्याकडून राजकीय धोका असू शकतो, पण शारीरिक धोका नाही. पुण्यात माझ्याविरोधात ज्यानं तक्रार दिली त्याला पोलिसांनी (Pune Police) आणि सरकारने संरक्षण द्यावं, असेही अजित पवार यांनी म्हटलं.

 

यावेळी अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी काही ना काही वक्तव्य करतात. कारण नसताना महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) अंतर पडू शकते. काँग्रेसचे काही अंतर्गत प्रश्न आहेत. ज्याने त्याने पक्षाचे अंतर्गत प्रश्न सोडवावे. आम्हाला वाटतं आघाडी टीकावी. टाळी एक हाताने वाजत नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात येतात, असं म्हणत अजित पवारांनी नाना पटोलेंच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीवर बोलताना अजित पवार म्हणाले, त्या दोघांमध्ये बरेच दिवस झाले भेट झाली नव्हती. त्यामुळेच संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे भेटायला आले होते. त्यांच्यात तास-दीड तास चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या संदर्भात किंवा गेल्या काही काळात प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य झाली होती. त्यासंदर्भात चर्चा झाली असावी. याबाबत योग्य तपशील माहित नाही. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईतील सभेबाबतही चर्चा झाली असावी, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawars reaction regarding mahavikas aghadi

 

हे देखील वाचा :

Dr. Babasaheb Ambedkar Samarpan Award | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांना जाहीर

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

NCP Chief Sharad Pawar | शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या भेटीत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली? शरद पवारांनी केला खुलासा

Pune Crime News | भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी एस.एन. सिस्टम प्रा.लि. कंपनीचा डायरेक्टर ओमकार सूनिल नाथी विरूध्द गुन्हा दाखल

 

Related Posts