IMPIMP

Ajit Pawar | CM शिंदेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या आरोपावर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘माझ्या बाजूला बसायचे तेव्हा…’

by nagesh
Ajit Pawar | send ajit pawar in pakistan says bjp former mla narendra pawar over statement sambhaji maharaj is not dharmveer

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –Ajit Pawar | बीकेसीवरील आपल्या दसरा मेळाव्या (Dasra Melava 2022) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका करताना म्हटले होते की, पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याच्या हट्टापायी तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) ही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. शिवसेनेच्या झेंड्याखाली राष्ट्रवादीचा अजेंडा राबवला, असे शिंदे म्हणाले. आता त्यांच्या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार म्हणाले, याला काही अर्थ नाही. तुम्ही मंत्रीमंडळात (Cabinet) होता ना, ते माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे. तेव्हा मी कधीच झेंडा शिवसेनेचा आहे, पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे असे ऐकले नाही. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 1999 ला देखील आम्ही आघाडी केली होती. 2004, 2009 आणि आता 2021 मध्येही केली होती. अडीच वर्षात जे काही निर्णय घेण्यात आले ते सर्वांनी मिळून घेतले होते. त्यांची काही वक्तव्ये राजकीय स्वरुपाची होती. त्याला फार काही महत्त्व द्यावे असे वाटत नाही.

 

तुम्हाला कोणाचे भाषण आवडले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार म्हणाले, आवडी निवडीसाठी ही भाषणे नव्हती. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्यासाठी दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर शिवसैनिक (Shiv Sainik) शिवाजी पार्कात (Shivaji Park) येत होते. आता पिढ्या बदलल्या असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी येत आहेत.

 

पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले की, एसटीला 10 कोटी रुपये देऊन लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. मला काहींनी बसेस तिथे गेल्याने सणाच्या दिवशी इतर सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाल्याचे सांगितले. अशा गोष्टी करता कामा नये. पण काही भाषणे फारच लांबली, नको तिथे लांबली. आता ती कोणती ते तुम्हीच ठरवा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार म्हणाले, भाषणाची सर्वांना उत्सुकता होती. दोन्हीकडे गर्दी झाली होती.
मीडियानेही अनेकांच्या मुलाखती घेतल्या, त्यावेळी काहींनी आम्हाला का आणले आहे हेच माहिती नाही असे सांगितल्याचे मी ऐकले.
माझे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु होते.
संध्याकाळी आईला भेटण्यासाठी गेल्यानंतर तिथे टीव्हीवर मी भाषणे ऐकली.
त्यांच्या भाषणावर आम्ही टीका करण्याचे काही कारण नाही.
पण महाराष्ट्रातील जनता आणि विशेषत: मतदारांनी, शिवसैनिकांनी आपण काय केले पाहिजे,
पुढील भूमिका काय असली पाहिजे, कोणाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, कोणाची मूळ शिवसेना आहे याचा विचार केला पाहिजे.

 

आघाडी सरकाने टक्केवारी जास्त मागितली म्हणून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project)
गुजरातला गेला असा आरोप शिंदे गटाने (Shinde Group) केला असल्याचे सांगितल्यानंतर अजित पवार
(Ajit Pawar) म्हणाले, टक्केवारी मागितली हे सिद्ध करुन दाखवा. हे धादांत खोटे आहे.
वेदांतला सवलती देण्यासंबंधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्यात बैठक झाली होती.
आज त्यांच्या विचारांचे सरकार केंद्रात आणि राज्यात आहे.
तरुणांचा रोष आपल्यावर येईल यासाठी हे वक्तव्य त्यांनी केले.
सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना वेदांता प्रकल्प येत असल्याची माहिती दिली होती आणि आता टक्केवारीबद्दल
बोलायचे याला अर्थ नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ncp ajit pawar on allegation of maharashtra cm eknath shinde dasara melava bkc shivsena uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | रोहित पवारांनी सांगितले दसरा मेळाव्याच्या चढाओढीत कोण जिंकलं, म्हणाले – ‘शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा किल्ला अभेद्य’

Pune Crime | पुणे : 5 लाखाची खंडणी मागणाऱ्या पोलिस कर्मचार्‍यावर खंडणीचा FIR

Rain in Maharashtra | पुणे वगळता ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो’ अलर्ट, हवामान खात्याचा इशारा

 

Related Posts