IMPIMP

Rain in Maharashtra | पुणे वगळता ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो’ अलर्ट, हवामान खात्याचा इशारा

by nagesh
Rain In Maharashtra | it will rain in maharashtra between 11th and 14th december due to west bengal cyclone

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक भागांमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असला तरी राज्यभरात पावसाचा (Rain in Maharashtra) जोर कमी झाला आहे. पण हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे (Pune) वगळता अन्य जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, राज्यात परतीच्या मान्सूनसाठी (Rain in Maharashtra) सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. अशात आता हवामान विभागाने (Meteorological Department) मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी केला आहे. महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस परत आला आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून (Monsoon) माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

 

आज (गुरुवार) विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

 

 

येलो अलर्ट म्हणजे काय?

 

येलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? तर या येलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच येलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो.
हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. ज्यावेळी हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो.
तुम्हाला तात्काळ धोका नाही. मात्र, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासात दक्षता घेतली पाहिजे, असा या येलो अलर्टचा अर्थ आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rain in Maharashtra | yellow alert for rain in marathwada and west maharashtra along with entire vidarbha

 

हे देखील वाचा :

IND vs SA ODI Series | दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup | मॅच फिनिशर की पॉवर प्ले स्पेशालिस्ट? टीम इंडिया ‘या’ धडाकेबाज खेळाडूवर कोणती देणार जबाबदारी

Pune Crime | पैशाच्या लोभापायी पैसे गेले अन् जमीनही; २५ लाख फसवणूक प्रकरणी FIR

 

Related Posts