IMPIMP

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडेल’, जयंत पाटील यांचे सूचक भाकित; अजित पवार म्हणाले…

by nagesh
Maharashtra Political News | 'Ajit Dada will do the correct program', Shiv Sena Minister's important statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आमदारांच्या पात्रतेच्या मुद्यावर
कोसळू शकेल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी
राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखालील सत्तेत असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या
अधिवेशनानंतर पडेल, असे सूचक भाकित केलं आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी सरकारच्या स्थिरतेबाबत मोठं
विधान केलं. जोपर्यंत 145 आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जयंत पाटील यांनी वर्तवलेल्या भाकिताबाबत पत्रकारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला. तेव्हा याबाबत त्यांनाच विचारा, असं प्रत्युत्तर पवार यांनी दिलं. त्यांचं मत त्यांना लखलाभ असं म्हणत जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणे टाळलं. शर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादीचे दोन दिवसीय मंथन शिबीर सुरु होत आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिर्डीत दाखल झाले आहेत.

 

दरम्यान, महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. शिंदे आणि फडणवीसांच्या अपयशामुळेच हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. अधिवेशनामध्ये यासंदर्भात महिती देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

पुढची पुजा मवीआचा मुख्यमंत्री करेल
सरकारबाबत जयंत पाटील यांच्या वक्तव्याला आमदार अमोल मिटकरींनी (MLA Amol Mitkari) दुजोरा दिला आहे.
सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे.
आषाढी (Ashadhi Ekadashi) आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात.
पण येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री करतील.
आम्हाला विश्वास आहे की 100 च्यावर आमदार आम्ही निवडून आणू.
आगामी काळात राष्ट्रवादीचेच मुख्यमंत्री दिसतील, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar commented on jayant patil and amol mitkari predictions about shinde fadanvis government

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडेल, जयंत पाटील यांचे भाकित

Pune Crime | मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी घेतलेल्या पैशांच्या दामदुप्पट वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी देणार्‍या सावकाराला अटक; दरमहा ३० टक्के व्याज करीत होता वसुल

Kartiki Ekadashi | औरंगाबादचे दाम्पत्य ठरले महापूजेचे मानकरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापूजा

 

Related Posts