IMPIMP

Ajit Pawar | ’20 जूनपर्यंत आम्ही एकत्र होतो, काय एक दिवस त्यांच्या मनात…’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reaction on shinde fadnavis governments on award announced of marathi translation of kobad gandhi original english book was cancelled

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन  – Ajit Pawar | हल्ली राजकारणात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. 20 जूनपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो. काय एका दिवशी त्यांच्या मनात आलं आणि गेले 15 लोकं घेऊन. काय आता तुम्ही… हे एकदम ओक्केच झालं.. काय आता बोलायचं? अशी खोचक टिप्पणी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील (Shivsena) बंडावर करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नगरमधील श्रीगोंद्यात एका कार्यक्रमात पवार बोलत होते. (Ajit Pawar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, याआधी गणेशोत्सव वर्षानुवर्ष चालत आले आहेत. पण कधीही मागच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी गणपतीच्या दर्शनाला कुणाच्या घरी गेले नाहीत. (Ajit Pawar)

 

आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरते. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला?, असा सवाल पवार यांनी केला.

 

अजित पवार म्हणाले, जो गणेशभक्त आहे, त्याने अशा पद्धतीने देखावा करण्याचे कारण नाही.
तुम्ही तुमच्या मनात ठेवा ना. पण आता काहींना शो करण्याचीच सवय आहे.
राज कपूर पूर्वी शोमॅन म्हणून ओळखला जायचा. तशी सवय काहींना आता लागली आहे.
जनतेनेच बघावे काय चालले आणि काय नाही.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar mocks cm eknath shinde group mla rebel maharashtra politics

 

हे देखील वाचा :

Probiotics | महिलांनी आपल्या डाएटमध्ये समाविष्ट केले पाहिजे प्रोबायोटिक्स, अनेक समस्यांपासून होईल सुटका

Gold Price Weekly | ‘या’ आठवड्यात अचानक स्वस्त झाले सोने, परदेशी बाजारात सुद्धा घसरला भाव

Protein Rich Vegetables | मांस आणि अंडे आवडत नाही का? मग प्रोटीन मिळवण्यासाठी सेवन करा ‘या’ 5 भाज्या

 

Related Posts