IMPIMP

Ajit Pawar | ‘माझ्यावर एवढं प्रेम का ऊतू चाललंय, तेच कळेना’, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

by nagesh
 Ajit Pawar | ncp leader ajit pawar mocks shinde fraction gulabrao patil statement

नागपूर :  सरकारसत्ता ऑनलाईन – नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha Nagpur) होणार आहे. या
सभेच्या निमत्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या होमपीचवर ही सभा
होत आहे. या सभेत नेतेमंडळी कशी राजकीय फटकेबाजी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar)
नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक राजकीय (Maharashtra Political News) मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी
अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्याविषयी सुरु असलेल्या चर्चांवर बोलताना मिश्किलपणे उत्तर दिले.

 

जसं नागपूर फडणवीसांचे होम पीच तसं…
मविआची आज होणारी सभा नागपुरात होणार असून ते देवेंद्र फडणवीसांचे होम पीच असल्यामुळे राजकीय टोलेबाजी होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात कुणाचं ना कुणाचं होम पीच असतं. आम्ही राज्याच्या वतीने सभा घेत आहोत. जसं त्यांचं होम पीच आहे, तसं अनिल देशमुख (Anil Deshmukh), सुनील केदार (Sunil Kedar) यांचं देखील होम पीच आहे. नितीन राऊतांचे (Nitin Raut) होम पीच असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एवढं प्रेम ऊतू का चाललंय?
दरम्यान, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मला एक कळत नाही की माझ्यावर सगळ्यांचं प्रेम एवढं का ऊतू चाललंय? मी दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत (Uday Samant), दादाजी भुसे (Dadaji Bhuse) बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचं एवढं प्रेम का ऊतू चाललंय ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरु केल्याचे अजित पवार म्हणाले.

 

अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट?
अजित पवार आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यात गुप्त भेट झाल्याच्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकला. कुठं झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शाह उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या (Vinod Tawde) घरी गेले. तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होते. मात्र सभा संध्याकाळी असल्यामुळे माझं अनिल देशमुखांशी बोलणं झालं. याठिकाणी एक कार्यक्रम आहे, तो करुन दुपारी अनिल देशमुख यांच्या घरी जेवायला जाणार आहे. त्यामुळे या सर्व चर्चा बिनबुडाच्या आहेत. अशा गोष्टी लपून राहत नसतात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण करु नये असं अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar mocks shinde fraction gulabrao patil statement

 

हे देखील वाचा :

Vijay Shivtare On Ajit Pawar | अजित पवार भाजपमध्ये येणार हे कोणाला आवडणार नाही, त्यांनी शिवसेनेत यावं; विजय शिवतारेंचे खुलं आमंत्रण

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME) | पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अग्रेसर ! देशात सर्वाधिक 6 हजार 592 वैयक्तिक प्रकल्पांना मंजुरी

Pune Crime News | पुणे-चंदननगर क्राईम न्यूज : तुझ्या व्यवसायाची वाट लावेल ! सुपरवायझरने मालकाला मागितली 50 लाखांची खंडणी

 

Related Posts