IMPIMP

Ajit Pawar On Pune Police | पुणे पोलिसांच्या ‘त्या’ निर्णयावर अजित पवारांची टीका; म्हणाले – ‘…तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नयेत’ (VIDEO)

by nagesh
Ajit Pawar On Pune Police | reward for not finding the culprit dont break new ground ajit pawar criticizes pune polices decision pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar On Pune Police | एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन (Veerappan), चार्ल्स शोभराज (Charles Sobharaj) सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस (Prize) जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नयेत, असा सल्ला पुणे पोलिसांना (Pune Police) दिला आहे. पुणे पोलिसांनी घेतलेल्या त्या निर्णयावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Ajit Pawar On Pune Police)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना बक्षीस देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला होता. फारार असणाऱ्या, पाहिजे असणाऱ्या, शस्त्र बाळगणाऱ्या आणि सराईत गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना 5 ते 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले होते. पुणे पोलिसांनी घेतलेल्या निर्णयावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. (Ajit Pawar On Pune Police)

 

 

अजित पवार म्हणाले, एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती जर पोलिसांना सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जा. परंतु सरसकट बक्षीस जहीर होत असेल तर पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कायदा सुव्यवस्था (Law and Order) राखणे आणि महिलांवर अत्याचार (Abuse of Women) होऊ न देणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र या कामासाठी त्यांना आमिष दाखवल जात असेल तर ते योग्य नाही.

 

पोलिसांनी सीसीटीव्ही, खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करणे गरजेचे आहे.
नवीन पायंडे पाडण्याची गरज नाही.
त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी बक्षीस घेण्याचा निर्णय का घेतला हे
मी त्यांना विचारणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar On Pune Police | reward for not finding the culprit dont break new ground ajit pawar criticizes pune polices decision pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्कातील आरोपी पसार; प्रचंड खळबळ

Satyajit Tambe | पदवीधर मतदारसंघाच्या निकालाआधीच पुण्यात सत्यजीत तांबे यांच्या विजयाची पोस्टरबाजी

Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts