IMPIMP

Amit Thackeray | सत्तेत लवकरच येणार, अमित ठाकरेंचे सूचक वक्तव्य; राज ठाकरेंचे दोन विश्वासू शिलेदार ‘वर्षा’वर

by nagesh
 Amit Thackeray | raj thackeray son mns leader amit thackeray hints at party getting power soon maharashtra politics news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मनसे नेते (MNS Leader) आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी आम्ही लवकरच सत्तेत येणार असल्याचे सूचक वक्तव्य अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी माध्यमांशी बोलताना केले. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे दोन विश्वासू शिलेदार वर्षा निवासस्थानी गेले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे समर्थक आमदार रवींद्र फाटक (MLA Ravindra Phatak) यांनी त्यांचे स्वागत केले. या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. मनसे नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाढती जवळीक आगामी काळात युतीच्या माध्यमातून पहायला मिळेल अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दादर चौपाटीवर (Dadar Chowpatty) जाऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना आम्ही सत्तेत लवकरच येणार असल्याचे वक्तव्य केले. अर्थात ही सत्ता मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) येणार की राज्यात हे अनुत्तरित आहे. याआधी अमित ठाकरे यांना शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपद (Cabinet Minister) मिळणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. तर शिंदे गट-भाजप (BJP)-मनसे यांची महायुती होणार असल्याची चर्चाही जोरावर आहे.

 

 

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वर्तुळात गाठीभेटींचा सिलसिला वाढला आहे.
राज ठाकरेंनी नुकतीच वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
तर एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी गणरायाचे दर्शन आणि राज ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस केली होती.
यानंतर राज ठाकरे यांचे महत्त्वाचे शिलेदार असणारे मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) हे वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते.
या नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Amit Thackeray | raj thackeray son mns leader amit thackeray hints at party getting power soon maharashtra politics news

 

हे देखील वाचा :

Weight Loss Diet | तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 वस्तू, वाढणार नाही वजन

Top Stocks | कोणत्या शेअरने मिळेल पैसा? फेस्टिव्ह सीझनसाठी एक्सपर्टने सुचवले ‘हे’ 5 स्टॉक्स

Cheese खाल्ल्याने आरोग्याला होतात असंख्य फायदे, असा करा डेली डाएटमध्ये समावेश

 

Related Posts