IMPIMP

Weight Loss Diet | तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 वस्तू, वाढणार नाही वजन

by nagesh
Weight Loss Diet | quick weight loss diet foods helps to lose weight naturally

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Weight Loss Diet | संतुलित वजन म्हणजे निरोगी शरीर, हे सर्वांनाच माहीत आहे, पण लाखो प्रयत्नांनंतरही तुमचे वजन कमी होत नसेल तर व्यायाम (Exercise) आणि जिमसोबतच आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने फक्त आपल्या आहारावर नियंत्रण ठेवले तर तो आपले वजन कित्येक किलोने सहज कमी करू शकतो (Weight Loss Diet). जर तुम्ही सुद्धा वेट लॉस जर्नीमध्ये या 5 गोष्टींचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रित करू शकता (Ways to Lose Weight Without Dieting).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

1. आवळा –
आवळ्यातील फायबर बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास आणि आतड्यांची हालचाल सुलभ करून पचन करण्यास मदत करते. आवळा मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतो. मेटाबॉलिज्म जितके जलद होईल तितक्या वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.

 

2. पपई (Papaya) –
पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे भूक कमी करण्यास आणि पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. एवढेच नाही तर पपईमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरी कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

 

3. अंडी (Egg) –
जर तुम्ही अंडी खात असाल तर तुमच्या सकाळच्या नाश्त्यात नक्कीच त्याचा समावेश करा. अंडी हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. ते खाल्ल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही. तसेच ते तुमच्या शरीराला ताकद देते.

 

4. सलाड (Salad) –
दुपारच्या जेवणासोबत सलाड खाल्ल्याने कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात राहते. संशोधकांच्या मते, सलाडचे सेवन केल्याने भूक कमी लागते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फॉलिक अ‍ॅसिड आणि लाइकोपीन असते. या सर्वांच्या उपस्थितीमुळे शरीरावर चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो.

 

5. मूगडाळ (Mung Bean) –
मूगडाळ हलकी आणि पचण्याजोगी असते, तसेच ती प्रोटीनयुक्त असते.
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी या डाळीचा आहारात समावेश करावा.
तुम्ही आहारात मूग डाळ खिचडीचा समावेश करू शकता. याशिवाय नाश्त्यात मोड आलेले मुग ही खाता येतात.
एक कप अंकुरित मूगात सुमारे 26 कॅलरीज असतात. (Weight Loss Diet)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Diet | quick weight loss diet foods helps to lose weight naturally

 

हे देखील वाचा :

Top Stocks | कोणत्या शेअरने मिळेल पैसा? फेस्टिव्ह सीझनसाठी एक्सपर्टने सुचवले ‘हे’ 5 स्टॉक्स

EPFO Calls For Increasing Retirement Age | सरकारी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीच्या वयावर मोठ्या निर्णयाची तयारी, अमेरिका-यूरोपच्या मॉडलवर विचार

Cheese खाल्ल्याने आरोग्याला होतात असंख्य फायदे, असा करा डेली डाएटमध्ये समावेश

 

Related Posts