IMPIMP

Andheri By-Election | राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपाची माघार, मनसेने प्रतिक्रिया देताना म्हटले – ‘जर हा निर्णय…’

by nagesh
MNS | mns manoj chavan tweet diwali firecrackers masjid loudspeaker mumbai police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपाने माघार घेतल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक (Andheri By-Election) बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून, शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी मुरजी पटेल (Murji Patel) यांची अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील (Andheri By-Election) उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले होते.

 

तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले होते. यानुसार आज अखेर भाजपने (BJP) माघार घेतली आहे. या घडामोडीवर आता मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपाच्या या निर्णयानंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रतिक्रिया देताना,
हा निर्णय आधीच झाला असता, राजकीय चिखलफेक टाळता आली असती, असे म्हटले आहे.
देशपांडे यांनी म्हटले की, काल राज ठाकरेंनी पत्र लिहिले होते. भाजपाने त्यावर गांभीर्याने विचार करून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.

 

भाजपाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुळात गेल्या एक महिन्यापासून राज्यात जी चिखलफेक सुरू होती,
ती टाळता आली असती. मात्र, आता शेवट गोड होतोय याचा आनंद आहे, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Andheri By-Election | mns sandip deshpande reaction after bjp withdrws candidate andheri by election

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कुख्यात गजा मारणे टोळीतील आणखी एकाला अटक; आतापर्यंत 10 जणांना अटक

Rutuja Latke | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Pune Crime | महिलेकडे 40 लाखाची खंडणी मागणारा इराणी गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Related Posts