IMPIMP

Anjali Damania | मोठी बातमी : अंजली दमानिया भुजबळांविरूद्ध करणार होत्या मोठा खुलासा, तत्पूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात

by sachinsitapure
Anjali Damania

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Anjali Damania | मुंबईतून एक अतिशय खळबळजनक अशी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यासाठी निघालेल्या सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांना पोलिसांनी (Mumbai Police) वाटेतच ताब्यात घेतले. यावेळी दमानिया आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली. राज्य सरकारच्या (State Govt) या दडपशाही विरोधात आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

काल अंबड, जालना येथे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी अतिशय प्रक्षोभक असे भाषण केले. या भाषणावर देखील सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. अंजली दमानिया आज छगन भुजबळ यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर पत्रकार परिषद घेऊन भुजबळांविषयी मोठा खुलासा करणार होत्या. मात्र, तत्पूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अंजली दमानिया (Anjali Damania) यांना पोलिसांनी मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) आणले आहे.
अंजली दमानिया यांनी पोलीस वाहनात बसण्यास नकार दिल्याने महिला पोलीस आणि दमानिया यांच्यात झटापट झाली.

ओबीसीमधील ६० टक्के लोक भाजपाला मतदान करतात. त्यामुळे जर ओबीसींच्या ताटातून काढून ते त्यांना (मराठा समाज)
देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हणत काल भुजबळ यांनी राज्य सरकारलाच इशारा दिला होता.
भुजबळ यांचे भाषण प्रक्षोभक होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्याबाबत अंजली दमानिया कोणता गंभीर खुलासा करणार होत्या?
हा प्रश्न पोलिसांच्या कारवाईमुळे अनुत्तरित राहिला आहे.

Related Posts