IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | लाचेचे 3500 रुपये घेऊन पोलीस उपनिरीक्षक फरार, अ‍ॅन्टी करप्शनकडून शोध मोहिम

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनभांडणादरम्यान झालेल्या दुखापतीची नोंद न करता आणि मुलाचा मोबाईल देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागून
3500 रुपये लाच स्विकारणाऱ्या (Accepting Bribe) पोलीस उपनिरीक्षकाला (Police Sub-Inspector) मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti
Corruption Bureau (ACB) Mumbai) रंगेहाथ पकडले. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai)
सापळा रचल्याचे लक्षात येताच पोलीस उपनिरीक्षक (PSI) लाचेची रक्कम घेऊन पळून गेला. ही कारवाई सोमवारी (दि.21) साकीनाका पोलीस ठाण्यात (Sakinaka Police Station) करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

प्रविणकुमार सुरेश पवार Pravin Kumar Suresh Pawar (वय-30) असे लाचेची रक्कम घेऊन फरार झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत एका व्यक्तीने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) सोमवारी लेखी तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे साकीनाका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या मुलाला भांडणादरम्यान दुखापत झाली होती. याची तक्रार करण्यासाठी तक्रारदार साकीनाका पोलीस ठाण्यात गेले होते. पवार याने तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवून तक्रार (FIR) दाखल करुन घेतली नाही. तसेच तक्रारदार यांच्या मुलाचा 10 हजार रुपयांचा मोबाईल घेतला. मुलाचा मोबाईल परत करण्यासाठी पवार याने तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाच मागितली.

 

 

तडजोडीमध्ये 5 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. प्राप्त तक्रारीची सोमवारी मुंबई एसीबीकडून (ACB Mumbai) पडताळणी करण्यात आली. प्रविणकुमार पवार याने 5 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने साकीनाका पोलीस ठाण्यात सापळा रचला. आरोपी पवार याने तक्रारदार यांच्याकडे तडजोड करुन 3500 रुपये लाच घेतली. पथकाने त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र, पवार लाचेची रक्कम घेऊन तेथून फरार झाला. आरोपी प्रविणकुमार पवार याच्या विरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | Sakinaka Police Station Pravin Kumar Suresh Pawar Mumbai Bribe Case ACB Trap

 

हे देखील वाचा :

PF New Rules | मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून PF अकाऊंटवर सुद्धा लागणार टॅक्स, जाणून घ्या कुणावर होणार परिणाम

Police Commit Suicide | राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ची ‘गेम’ करणारे 6 जण ‘गोत्यात’, खूनाचं कारण आलं समोर

 

Related Posts