IMPIMP

Maharashtra Police | पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारची घोषणा

by nagesh
Maharashtra Police | maharashtra police officers get one thousand rupees hike in dress code incentive decision taken by home department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने (Home Department) याबाबतचे आदेश देखील जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) कार्य़रत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या (Police Officer) गणवेश भत्त्यामध्ये वाढ (Uniform Allowance Increase) करण्यात आली आहे. गृहविभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात एक हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये गणवेश भत्ता मिळणार आहे. राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) ते अपर पोलीस अधीक्षक (Addl SP) या अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गृह विभागाने पोलीस (Maharashtra Police) अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी (Government Decision issued) केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना यापूर्वी पाच हजार रुपये गणवेश भत्ता दिला जात होता. गणवेश भत्त्यामध्ये वाढ केली जावी अशी मागणी केली होती. अखेर गृह विभागाने पोलिसांची ही मागणी मान्य करत गणवेश भत्त्यात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सुरुवातीच्या दिवसात गणवेश भत्ता देण्याऐवजी गणवेशाचं साहित्य पोलीस कर्मचाऱ्यांना दिले जात होते.
अनेक दिवस हीच पद्धत सुरु होती.
मात्र 2021 मध्ये साहित्य देणं बंद करुन त्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला.
यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये गणवेश भत्ता दिला जात होता.
आता सहा हजार रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | maharashtra police officers get one thousand rupees hike in dress code incentive decision taken by home department

 

हे देखील वाचा :

Central Government | केंद्र सरकारकडून राज्य सरकारला नववर्षभेट; विविध योजनांसाठी मिळाले एवढे कोटी रूपये

Devendra Fadnavis | ‘धर्मवीर नाही म्हणणं हा द्रोह, अजित पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची टीका (व्हिडिओ)

E-Car | बापरे! एका चार्जमध्ये ७०० किलोमीटर धावणार ही इलेक्ट्रिक सेडान, नवीन इंटेरियर, नवीन फीचर, नाव आहे…

 

Related Posts