IMPIMP

BHR Scam | बीएचआर घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र कंडारेला अटक; अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

by bali123
arrest of main accused jitendra kandare inbhaichand hirachand raisoni bank scam case

पुणे :सरकारसत्ता ऑनलाइनBHR Scam | जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत ( Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co-operative Credit Society) हजारो कोटीचा घोटाळा करून पसार झालेल्या मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे (Jitendra Kandare) याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेने (economic offences wing pune) सोमवारी (दि. 28) रात्री इंदूर (Indore) येथून अटक केली आहे. कंडारेच्या अटकेमुळे अनेक मोठी मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात 230 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असलेल्या डायरीचा समावेश आहे. ही डायरी कुणाची ? याविषयी गूढ कायम आहे. तसेच हे पैसे कुठून आले अन् कुठे व्यवहार झाला याचा तपास सुरू आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जितेंद्र कंडारे (Jitendra Kandare) हा बॅंकेचा अवसायक होता. करोडो रुपयांच्या जमिनीची कवडीमोल विक्री करण्यामागे हाच मुख्य सूत्रधार होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने (economic offences wing pune) कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील मोठे व्यापारी तसेच राजकीय जवळीक असलेल्या 11 जणांना ताब्यात घेतले होते. या पतसंस्थेमध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली आहे. पतसंस्थेने जप्त केलेल्या मालमत्ता अगदी कवडीमोल किंमतीत विकल्या आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कागदपत्र जप्त केली. या प्रकरणी पोषण आहाराचे मोठे ठेकेदार सुनील झंवर यांच्या कार्यालायचीही झडती घेतली होती. यापूर्वीही बीएचआरच्या अपहार प्रकरणी राज्यभरात चेअरमनसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Titel : arrest of main accused jitendra kandare inbhaichand hirachand raisoni bank scam case

Related Posts